मुख्य बातम्या

राजुरी येथे 26 विद्यार्थींना झाली अन्नातून विषबाधा

0

राजुरी येथील 26 विद्यार्थींना शुक्रवारी सकाळी अन्नतून विषबाधा झाली. दिनदयाळ उपाध्यय ग्रामीण कौशल्य योजनेअंतर्गत शिक्षण घेण्यासाठी ह्या विद्यार्थीनी आल्या असून त्यांना जेवणातून विषबाधा झाली.

या विधार्थिनीवर तातडीने उपचार सुरु करण्यात आले आहेत. एका प्रायव्हेट लिमिडेट कंपनीच्या अंतर्गत सह्याद्री व्हॅली महाविद्यालयात दीनदयाळ उपाध्यय ग्रामीण कौशल्य योजनेअंतर्गत या विद्यार्थीनीना    प्रशिक्षण देण्यात येत होते.

Loading...

शुक्रवारी सकाळी प्रशिक्षण घेण्यासाठी आलेल्या २६ विध्यर्थ्याना थोड्यावेळाने मळमळ आणि पोटदुखी सारखे त्रास होऊ लागले. हा प्रकार समजताच लगेचच त्यांना राजुरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी  दाखल करण्यात आले. यामधील १२ मुलींना उपचारानंतर घरी सोडण्यात आले.

त्यातील एका मुलीला आळेफाटा येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. तसेच उर्वरित सर्व मुलींना सायंकाळी घरी सुखरूप सोडण्यात आले आहे. त्यांना हा सर्व त्रास भेसळयुक्त अन्नामुळे झाल्याचे राहुरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी रामप्रसाद धायकर यांनी सांगितले आहे.

Loading...

#SUNDAY SPECIAL : पारंपरिक वेशभूषेपासून तर फॅशनपर्यंत…

Previous article

मल्हारराव होळकरांविषयी हीन दर्जाचे लिखाण ; ‘जोडेमार’ आंदोलनाद्वारे जितेंद्र आव्हाडांचा निषेध

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *