Royal Entertainmentमुख्य बातम्या

“बधाई हो-2’मध्ये राजकुमार राव करणार धम्माल

0

बॉलीवूड अभिनेता आयुष्मान खुरानाचा ब्लॉकबस्टर “बधाई हो’ चित्रपटाला नुकतेच दोन वर्षे पूर्ण झाले आहेत. याप्रसंगी जंगली पिक्‍चर्सने चित्रपटाच्या सिक्‍वलची घोषणा केली आहे. या सिक्‍वलमध्ये राजकुमार राव आणि भूमी पेडणेकर लीड रोल साकारणार आहेत. राजकुमार राव याच्या “बरेली की बर्फी’च्या यशानंतर जंगली पिक्‍चर्सचा हा त्याच्यासोबत दुसरा चित्रपट आहे.
“बधाई हो 2’मध्ये राजकुमार राव आणि भूमी पेडणेकर हे एकदम नवीन अंदाजात चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. यात राजकुमार राव हा एका दिल्ली पोलीस हवालदाराची भूमिका साकारत आहे. जो एका महिला पोलीस ठाण्यात एकमेव पुरुष पोलीस कर्मचारी असतो. 
दुसरीकडे भूमी एक वेगळीच भूमिका साकारत आहे. जी यापूर्वी भूमीने कधीही साकारली नसेल किंवा बॉलीवूडमध्येही अशी भूमिका साकारली गेली असेल. ती म्हणजे एका शाळेत असलेली पीटीची शिक्षिका. दरम्यान, “बधाई हो’ने बॉक्‍स ऑफिसवर 100 कोटींहून अधिकचा गल्ला जमा केला होता.
The post “बधाई हो-2’मध्ये राजकुमार राव करणार धम्माल appeared first on Dainik Prabhat.

एसिडिटी झाल्यास करा सोपे घरगुती उपाय

Previous article

जर नवरात्रीत दिसले हे 3 संकेत तर समजून जा प्रत्यक्ष मातेचे घरात झाले आहे आगमन..

Next article

You may also like

Comments

Comments are closed.