टॉप पोस्टमनोरंजन

रजनीकांतचा ‘काला’ अडकला वादात, मानहानीचा दावा दाखल

0

रजनीकांतचा ‘काला’ हा सिनेमा 2018 मधील सर्वात बहुचर्चीत सिनेमा आहे; पण रजनीकांतचा हाच सिनेमा आता वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.  अनेक कारणांनी हा सिनेमा वादग्रस्त ठरत चालला आहे. रजनीकांंतने कावेरी पाणी वाटप विवादावर केलेल्या वक्तव्यानंतर कर्नाटकमधील अनेक संघटनानी या सिनेमाला विरोध केला आहे. त्यामुळे या सिनेमाला कर्नाटकमध्ये बंदी घालण्यात आली आहे. कर्नाटक फिल्म चेंबर आॅफ काॅमर्स यांनी देखील या चित्रपटाला सपोर्ट करणार नसल्याचे सांगितले आहे.

कर्नाटकमधील वादानंतर ‘काला’ सिनेमा आणखी एका नवीन वादात अडकला आहे. जवाहर नादर नावाच्या एका पत्रकाराने या चित्रपटाविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे. हा सिनेमा त्या पत्रकाराच्या वडिलांच्या आयुष्यावर आधारित असून या चित्रपटात त्यांचे नाव खराब करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप त्याने केले आहेत.

Loading...

जवाहर नादरने या चित्रपटाविरोधात न्यायालयात 101 कोटी रूपयांचा दावा दाखल केला आहे.

हा सिनेमा 7 जूनला जगभरात प्रदर्शित करण्यात येणार असून हिंदी, तामिळ, मल्याळम व तेलगू भाषेत प्रदर्शित होणार आहे. डायरेक्टर पा रंजीत बरोबर रजनीकांतचा हा दुसरा सिनेमा असणार आहे. याआधी दोघांनी कबाली या सिनेमामध्ये एकत्र काम केले होते.

‘काला’ सिनेमामध्ये रजनीकांतबरोबर नाना पाटेकर, हुमा कुरेशी व अंजली पाटील हे कलाकर देखील काम करणार आहेत.

 

(PHOTO INPUT :- FACEBOOK/KAALA)

 

Loading...

अमित शहा घेणार उद्धव ठाकरे यांची भेट, युतीसाठी तडजोड

Previous article

POEM : स्वच्छ नि सुंदर हरित भारत

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *