Royal politicsमुख्य बातम्या

अगोदरचे ही नकोत आणि आत्ताचे ही नकोत – राज ठाकरे

0

आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे पश्चिम विदर्भाच्या संघटना बांधणीच्या दौऱ्यावर्ती होते. यवतमाळमधील वणी येथे त्यांनी कार्यकर्त्यांशी मेळावा घेऊन संवाद साधला. 1989 साली प्रत्यक्ष राजकारणात आलो त्यावेळेस जे प्रश्न होते आजही तेच प्रश्न आहेत, निवेदन ही तीच आहेत, मग निवडणुका आणि राजकारण काय चाटायचे का अशी खंत राज ठाकरे यांनी व्यक्त केली.

चिखलदऱ्यातील दौऱ्यामधील आठवण सांगताना ते म्हणाले. तेथील लोकांनी सांगितले की, जनता तेथील स्थानिक भाजप आमदाराचा चेहरा विसरली आहे कारण चार वर्षे आमदार तेथील मतदार संघात फिरकलेलेच नाहीत. आजपर्यंत आपण काँग्रेसला शिव्या घालत होतो, पण आजचे सत्ताधारी ही तसेच आहेत.

Loading...

महाराष्ट्र दुष्काळात असून उद्धव ठाकरेंना मात्र राम मंदिर आठवते अशा शब्दात त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. अगोदरचे ही नकोत आणि आताचे ही नकोत असे म्हणत एकदा महाराष्ट्राची सत्ता माझ्या हाती देऊन बघा असे परखड मत राज ठाकरे यांनी मांडले.

मी मुख्यमंत्र्यांसारखं खोटं बोलणार नाही. सरकारचं अपयश तुम्ही घरोघरी जाऊन पोहोचवायला पाहिजे कारण तुमच्यापर्यंत खऱ्या बातम्या पोहचू दिल्या जात नाहीत, तुमच्या वेदना अपेक्षा कोणाला कळत आहेत, याची जाणीव ठेवा आणि बाकीचे राजकारणी पक्ष बाजूला सारा असे आवाहन राज ठाकरे यांनी वनी येथील मेळाव्यात कार्यकर्त्यांना केले.


हे ही वाचा – 

‘राम मंदिर नाही तर मत नाही’, या घोषणेसह पुढील आंदोलन करणार – प्रवीण तोगडिया

 

Loading...

रसिकाचे चाहते बनले प्रोडक्शनसाठी डोकेदुखी

Previous article

‘कॉमेडी’ चा बादशाह कपिल शर्मा चढणार बोहल्यावर, ठरला मुहूर्त

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *