Royal politicsटॉप पोस्ट

हिंदू की मुस्लिम ? राहुल गांधींनी स्पष्ट केले काॅंग्रेस कोणाचा पक्ष

0

सध्या राजकीय आखाडा हा धार्मिक आखाडा बनला आहे. लोकसभा निवडणूका जवळ अाल्या असल्याने प्रत्येक पक्ष एकमेकांवर धार्मिक द्वेषाचे आरोप करत आहे.

काॅंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी बीजेपीच्या मुस्लिम लोकांची पार्टी या मुद्दावर प्रत्युत्तर दिले आहे. ट्विट करत राहुल गांधी म्हणाले की, ‘मी रांगेमध्ये उभ्या राहिलेल्या शेवटच्या व्यक्ती बरोबर उभा आहे. माझ्यासाठी शोषित आणि त्रस्त व्यक्तीचा धर्म आणि जात जास्त महत्तवाची ठरत नाही. मी लोकांचे दुखः शोधतो.  त्यांची तिरस्कार आणि भिती घालवतो आणि त्यांना अलिंगन देतो. मला सर्वजण प्रिय आहेत. मी काॅंग्रेस आहे.’

Loading...

याआधी एका उर्दू वृत्तपत्राने दावा केला होता की, राहुल गांधीनी काॅंग्रेसला मुस्लमानांची पार्टी असल्याचे सांगितले आहे. वृत्तपत्रामध्ये छापलेल्या बातमीनुसार काॅंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मुस्लिम बुध्दिजीवींबरोबर झालेल्या बैठकीत ही गोष्ट म्हणाले होते. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी बरोबर अनेक भाजपच्या नेत्यांनी काॅंग्रेसवर टीका केली होती.

15 जुलैला आजमगढमध्ये झालेल्या रॅलीमध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, काॅंग्रेस फक्त मुस्लिम पुरूषांची पार्टी आहे की,  त्यांच्यामध्ये महिलांसाठी देखील जागा आहेत.

काॅंग्रेसने त्या बातमीला अफवाह असल्याचे म्हटले होते. पार्टीने दावा केला होता की, मुख्य मुद्दे आणि मोदी सरकारचे अपयशावरून लक्ष हटवण्यासाठी या अफवा पसरवल्या जात आहेत.

Loading...

राहुल गांधींबद्दल अपशब्द वापरल्या प्रकरणी बसपाच्या उपाध्यक्षाची मायावतींकडून हकालपट्टी

Previous article

झारखंड:- भाजप युवा मोर्चाकडून स्वामी अग्निवेश यांना मारहाण; आता साधू ही धोक्यात?

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *