Royal politicsभारतमुख्य बातम्या

राहुल गांधींच्या रोड शोमध्ये ‘बलून ब्लास्ट’

0

टीम महाराष्ट्र देशा- काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या रोड शो दरम्यान गॅसच्या फुग्यांमुळे आगीचा भडका उडाला. सुदैवाने आग न भडकल्यामुळे मोठा अनर्थ टळला. राहुल गांधींसह सर्व जण सुखरुप आहेत. राहुल गांधी सध्या मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. निवडणूक प्रचारासाठी राहुल गांधी यांनी जबलपूरला ८ कि.मीचा रोड शो केला. यादरम्यान आगीची ही घटना घडली.

काँग्रेस कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी आरतीची तयारी केली होती. शास्त्री ब्रिज परिसरात गॅसने भरलेले फुगेही होते. आरतीचं ताट गॅसच्या फुग्यांच्या संपर्कात आल्यामुळे लहानसा स्फोट होऊन आगीच्या ज्वाळा उठल्या.

Loading...

राहुल गांधी यांच्या बसपासून काही फूट अंतरावरच ही घटना घडली. त्यामुळे राहुल गांधींसह गाडीतील सर्वच नेते घाबरले. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. सुरक्षा यंत्रणांनी तात्काळ जमावाला दूर लोटलं.

भाजपच्या विरोधात देशहितासाठी एक व्हा- सोनिया गांधी

Loading...

कोणीही चालेल, मात्र शिवसेनेचा उमेदवार रत्नागिरीत टिकता कामा नये : निलेश राणे

Previous article

कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी : लोकसभेसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसला हव्या आहेत ‘इतक्या’ जागा

Next article

You may also like

Comments

Comments are closed.