Royal Entertainmentमुख्य बातम्या

राहू केतू च्या प्रभावा पासून वाचण्यासाठी करा हे सोप्पे उपाय!!

0

ज्योतिषशास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तींच्या कुंडलीत राहु-केतु अशुभ स्थानी असतील, तर उत्तम चाललेल्या आयुष्यात प्रतिकूल घटना घडू लागतात. नकारात्मक प्रभाव वृद्धिंगत होतो. अशावेळी व्यक्तीकडून घेतलेले गेलेले निर्णय वैयक्तिक आणि कौटुंबिक जीवनासाठी कष्टकारक, चिंतेत भर टाकणारे ठरू शकतात. याचे नुकसान दोन्ही पातळीवर सोसावे लागू शकते.
काही वेळा अथक परिश्रम आणि ढोर मेहनत घेऊनही अपेक्षित परिणाम साध्य होऊ शकत नाहीत. राहु-केतुचा अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी लाल किताब नामक ग्रथांत काही उपाय सांगितले गेले आहेत. त्यानुसार आचरण केल्यास राहु-केतुचा अशुभ, प्रतिकूल प्रभाव कमी होण्यास मदत होऊ शकते, असे म्हटले जाते.
भारतीय संस्कृती, परंपरांमध्ये दानचे महत्त्व अनन्य साधारण आहे. प्राचीन काळापासून दानाचे संस्कार, परंपरा आपल्याकडे चालत आलेली आपण पाहतो. राहु-केतुचा अशुभ प्रभाव करण्यासाठी काही गोष्टींचे दान करणे उपयुक्त ठरू शकते, असे सांगितले जाते. लाल किताब ग्रंथानुसार, राहु-केतुचा प्रभाव कमी करण्यासाठी वानरांना गुळ खायला द्यावा, असे सांगितले जाते.
तसेच आपल्या आराध्याच्या मंदिरात जाऊन पांढऱ्या रंगाची वा पांढऱ्या रंगाचा समावेश असलेल्या गोधड्या यथाशक्ती दान कराव्यात, असे म्हटले जाते. असे केल्याने राहु-केतुचा अशुभ प्रभाव दूर होण्यास मदत होते. राहु-केतुचा वक्रदृष्टी कमी होऊ शकते, असे म्हणतात
लाल किताब नामक ग्रंथानुसार, छाया ग्रह मानल्या गेलेल्या राहु-केतुचा अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी चांदीची अंगठी धारण करावी, असे म्हटले जाते. दुसरे म्हणजे एखादा पांढरा धागा पायाच्या दोन्ही अंगठ्यांना बांधावे. असे केल्याने राहु-केतुचा नकारात्मक प्रभाव कमी होण्यास मदत मिळू शकते. तसेच राहु-केतुचा अभुभ, नकारात्मक वा प्रतिकूल प्रभाव कमी करण्यासाठी कानात सोन्याचा दागिना परिधान करावा. असे करणे उपयुक्त ठरू शकते, असे सांगितले जाते.
लाल किताब नामक ग्रंथानुसार, राहु-केतुचा अशुभ प्रभाव दूर करण्यासाठी काही सर्वांत प्रभावी उपाय सांगण्यात आले आहेत. यापैकी काळ्या रंगाच्या श्वानाला दररोज काही ना काही खायला द्यावे. शक्य असल्यास काळ्या रंगाच्या श्वानाची जबाबदारी स्वीकारावी.
श्वानासंदर्भातील उपाय राहु-केतुचा अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी आणि सर्वाधिक परिणामकारक मानला जातो. यासह कुटुंबातील माता-भगिनी, कुमारिका यांचे आशीर्वाद राहु-केतुचा अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो, असे म्हटले जाते.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
The post राहू केतू च्या प्रभावा पासून वाचण्यासाठी करा हे सोप्पे उपाय!! appeared first on Tadka Marathi.

तेजस्विनी पाठोपाठ आणखी एका अभिनेत्रीने केले दुर्गा अवतारातील स्पेशल फोटोशूट

Previous article

माता संतोषीच्या कृपेणें ह्या 7 राशींच्या जीवनातून त्रासांचा अंधार दूर होईल, नशिब ही फळफळेल …

Next article

You may also like

Comments

Comments are closed.