Royal Entertainmentमुख्य बातम्या

बॉलीवूडच्या या फेमस अभिनेत्रीला अर्ध्या रात्री मिळाली होती मसाजची ऑफर, नंतर उचलले हे मोठे पाऊल

0

फिल्म इंडस्ट्री बाहेरून जितकी चमकदार आणि आकर्षक दिसते आतून तितकीच वाईट आहे. या फिल्म इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला अनेक प्रकारचे लोक मिळतील जे प्रत्येक परिस्थितीचा फायदा घेण्यास मागे हटत नाहीत. बॉलीवूडपासून हॉलीवूडपर्यंत जवळजवळ प्रत्येक फिल्म इंडस्ट्रीमध्ये कास्टिंग काउच सारख्या समस्या आहेत. ज्या लोकांना कास्टिंग काउचबद्दल माहिती नाही अशा लोकांना माहितीसाठी सांगतो कि फिल्म इंडस्ट्री संबंधी एखादी व्यक्ती जसे डायरेक्टर, प्रोड्यूसर, अॅक्टर इत्यादी समोरच्या व्यक्तीला काम मिळवून देण्यासाठी किंवा एक्स्ट्रा फेवर देण्यासाठी सं-बंध ठेवण्याची ऑफर देतात. सहसा हि समस्या इंडस्ट्रीमध्ये आलेल्या नवीन कलाकारांना फेस करावी लागते.
पण तुम्हाला जाणून हैराणी होईल कि बॉलीवूडची एक अभिनेत्री अशी देखील आहे जी इंडस्ट्रीमध्ये लोकप्रिय असून देखील तिला अशाप्रकारची ऑफर मिळाली आहे. वास्तविक आम्ही इथे ज्या अभिनेत्री बद्दल बोलत आहोत तिचे नाव राधिका आपटे आहे. पॅडमॅन, लस्ट स्टोरीज, आणि सेक्रेड गेम्स सारख्या चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचे उत्कृष्ठ प्रदर्शन करणारी अभिनेत्री राधिका आपटे आज बॉलीवूडमधील एक प्रसिद्ध नाव आहे. सध्या राधिका नेटफ्लिक्स सोबत अनेक वेबसिरीजबद्दल नेहमी चर्चेमध्ये राहत असते.नुकतेच एका मुलाखतीमध्ये राधिकाने कास्टिंग काउचबद्दल मोठा खुलासा केला आहे. राधिकाने हि गोष्ट स्वीकारली आहे कि इंडस्ट्रीमध्ये अभिनेत्रींना अशाप्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो. अशामध्ये तिने आपला एक वैयक्तिक अनुभव शेयर करताना सांगितले एका चित्रपटाच्या दरम्यान तिला अर्ध्या रात्री मसाजची ऑफर मिळाली होती.
वास्तविक राधिका त्यावेळी एका हॉलीवूड चित्रपटाची शुटींग करत होती. चित्रपटाच्या शुटींगदरम्यान तिला बॅक पेनची समस्या होत होती. अशामध्ये चित्रपटाच्या एका क्रू मेंबरने राधिकाला म्हंटले कि जर तिला जास्त त्रास होत असेल तर ती त्याला रात्री बॅक मसाजसाठी बोलवू शकते. राधिकाला हि गोष्ट जरा विचित्र वाटली ती अस्वस्थ झाली आणि दुसऱ्या दिवशी तिने चित्रपटाचे डायरेक्टर आणि प्रोड्यूसर यांना याबद्दल तक्रार केली.तक्रारीनंतर त्यांनी राधिकाला आश्वासन दिले कि पुन्हा असे कधी होणार नाही. यानंतर ती व्यक्ती राधिकासोबत चांगला व्यवहार करू लागली होती. राधिका म्हणते कि खरे तर मला नंतर समजले कि मसाज ऑफर करने त्यांच्या कल्चरमध्ये सामान्य बाब आहे. त्या व्यक्तीने हि ऑफर मला मदतीच्या भावनेने दिली होती.
राधिका पुढे म्हणाली कि या घटनेनंतर ती व्यक्ती माझ्याशी चांगली वागत होती. त्याने माझी माफी देखील मागितली. आता हि वेगवेगळ्या ठिकाणांच्या सिस्टीमची गोष्ट आहे. आपल्या देशामध्ये अशा ऑफरचा चुकीचा अर्थ काढला जातो पण दुसऱ्या देशामध्ये हि सामान्य बाब आहे. बॉलीवूडच्या अनेक अभिनेत्रींनी याआधी कास्टिंग काउचची गोष्ट स्वीकारली आहे. हे आज देखील फिल्म इंडस्ट्रीमधील कटू सत्य आहे जे लवकर संपुष्टात आले पाहिजे.
The post बॉलीवूडच्या या फेमस अभिनेत्रीला अर्ध्या रात्री मिळाली होती मसाजची ऑफर, नंतर उचलले हे मोठे पाऊल appeared first on Yesमराठी.

अंकिता लोखंडेसाठी सुशांतने खरेदी केला होता करोडोंचा फ्लॅट, भरत होता EMI, आता अंकिताने उघड केले सत्य

Previous article

अभिनेता नाही तर शेफ बनायचे होते धनुषला, रजनीकांतच्या मुलीसोबत झाले होते प्रेम, कमी वयामध्येच कमावली अपार संपत्ती

Next article

You may also like

Comments

Comments are closed.