Royal Entertainmentटॉप पोस्ट

Race 3 Movie Review:- नुसतीच धावाधाव, स्टंट आणि गाड्यांची जाळपोळ

0

ईद का तोफा असलेला ‘रेस 3’ म्हणजे ‘मोठा सेट आणि पोकळ भेट’ ठरली. सुरूवातीला पार्श्वकथाच अशी मांडण्यात आली की शमशेर(अनिल कपूर)आणि फॅमिली पूर्ण उघड करण्यात आली. पण कोण कोणाचा कोण हे असं काही रंगवलयं की कथेच्या शेवटीच ते उघड होतं.

आता सलमान खान म्हणजे सिकंदरची एंट्री अशी डिंच्याक आहे की, लहान भावंडांना वाचवण्यासाठी बडा भाई येतो सुपरमॅन बनून.. अगदी उडत उडत. हे दोघे भावंड (सूरज, संजना) आपल्या बापावर राणा अटॅक करतो म्हणून बदला घ्यायला जातात आणि भाई आल्यावर अशी काही जंप मारून बाहेर येतात की प्रेक्षक नाईलाजास्तव टाळ्या वाजवणारच.  हे दोघं एकमेकांना जरा जास्तच ब्रो-ब्रो करतात; पण सूरज आपली बहीण संजनाला ब्रो-ब्रो का म्हणतो हे काही कळत नाही. तसा या दोघांनी संपूर्ण पिक्चरमध्ये अपेक्षेप्रमाणे चांगला अभिनय केला आहे.

Loading...

सिकंदर आणि भावंड एक मस्त फाइट करतात आणि आता एक- दोन जण मारायचे राहिलेले असताना अपेक्षा नसताना यश (बॉबी देओल) ची एंट्री होते. या भन्नाट एंट्रीने सलमानच्या चेहर्‍यावरचे हाव भाव बघूनच हसायला येते. बाकी बॉबी देओल शेवटपर्यंत अभिनयात कमकुवत भूमिकेत दिसतो.

जेसिका (जैकलीन ) आणि सिकंदरच्या भेटी नंतरची गाणी अत्यंत कंटाळवाणी आणि रडकी वाटतात. परंतू जैकलीनचे पूर्ण पिक्चरमध्ये जास्त संवाद नसले तरी ती गाण्यात आपल्या आदाकारीने आणि डान्सने  भाव खाऊन जाते. ‘माय बिसनेस इज  माय बिसनेस, इट्स नन ऑफ यूअर बिसनेस ‘ असे काही टुकार इंग्लिश संवाद सोडले तर जास्त संवाद तिच्या वाटेला येतच नाहीत.

विशेष म्हणजे अनिल कपूर ची भूमिका. उत्तम अभिनय. पण त्याच्या एका गोळीवर गाड्या पेट कशा घेतात हे काही कळत नाही, गाडी कोणतीही असुदे ती उडाली की ती पेट घेणारच.

फॅमिली के लिए कुछ भी, असं म्हणता म्हणता पिक्चर त्या फॅमिली पुरताच मर्यादित राहतो. ओढून ताणून उगाच कॉमेडी करण्याचा प्रयत्नात ती कॉमेडी बोर वाटते. इंटरवल नंतर सगळी कथा एका हार्डडिस्क भौवती फिरते की काय असं वाटतानाच पुन्हा धावाधाव, स्टंट आणि गोळीबार चालू होतो. आणि पुन्हा सिकंदर आणि जासिका सुपरमॅन बनून तिथून गायब होतात. आणि पुन्हा गाणं आणि डान्स. सततची गाणी आणि डान्स हैराण केल्यासारखं वाटतात.

गाड्यांची उडवा उडवी आणि आणि गोळ्याचा सततचा मारा याशिवाय पिक्चर मध्ये पाहण्यासारखे जास्त विशेष नाही. फक्त शेवटी होणारा ट्विस्ट पाहण्यासारखा आहे.  सिनेमोटोग्राफीतून दाखवलेली भव्य दिव्यता, बॅकग्राऊंड म्युझिक यामुळे पिक्चर मध्ये थोडाफार दम राहतो. मोठ्या बॅनर खाली काम करताना दिग्दर्शक रेमो डिसूझा चा प्रयत्न तसा चांगला होता.

बाकी ‘आल्हा दुहाई है’ हे गाणं रेस 1 मधलंच चांगलं होतं हे जाताजाता प्रेक्षक नक्कीच म्हणतात.  आणि प्रेक्षक बॉबी देओल आणि डेजी शहाच्या गाण्यावर कडकडून टाळ्या का वाजवतात हे तुम्हीच प्रत्यक्ष पाहायला जाऊनच अनुभव घ्या.

RATEING –  1/5

दिग्दर्शक- रेमो डिसूझा

निर्माता- रमेश तौरानी, सलमान खान (SKF)

कथा लेखक- शिरज अहमद

कलाकार- सलमान खान, अनिल कपूर, बॉबी देओल, जैकलीन, डेजी शहा, साकीब  सलीम.

कालावधी- 2 तास 40  मिनिट

 

Read this review in English also-

Race 3 Movie Review: Zero redeeming points in this moronic thriller

Loading...

कोण होते शुजात बुखारी? ज्यांची काश्मीरमध्ये हत्या करण्यात आली

Previous article

विहिरीत अंघोळीसाठी उतरल्याबद्दल तीन लहान मुलांना क्रूर मारहाण; महाराष्ट्रासाठी लज्यास्पत घटना

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *