Royal politicsमुख्य बातम्या

पाकिस्तानात भाषा कधीच बदलत नाही; मात्र दक्षिण भारतात गेलात तर तुम्हाला त्यांची भाषा शिकावी लागते- नवजोत सिंग सिद्धू

0

पाकिस्तानात तुम्ही कधीही जा. तिथे  ना भाषा बदलते ना माणस आणि तेथील खाद्यसंस्कृती. मात्र तुम्ही दक्षिण भारतात गेलात तर तिथे तुम्हाला इंग्रजी किंवा त्यांची भाषा शिकावी लागते. पाकिस्तानात मात्र असे काही होत असे काँग्रेसचे नेते नवजोत सिंग सिद्धू यांनी म्हटले आहे.

पाकिस्तानात इमरान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधिला कॉंग्रेसचे नवजोत सिंग सिद्धू जाऊन आले होते. त्यानंतर पुन्हा एकदा त्यांचे पाकिस्तान बद्दलचे प्रेम दिसून आले आहे. हिमाचल प्रदेशातील कसोली या ठिकाणी असलेल्या साहित्य उत्सवात ते बोलत होते. त्यावेळी नवजोत सिंग सिद्धूंनी पाकिस्तानबद्दल गोडवे गायले आहेत.

Loading...

माझा पाकिस्तानचा दौरा दक्षिण भारतातील दौऱ्यापेक्षा खूपच चांगला होता असे सिद्धू यांनी सांगत दक्षिण भारताची पाकिस्तान बरोबर तुलना केली आहे.

इमरान खान यांच्या शपथविधी सोहळ्याला पाकिस्तानात जाणार की नाही यावरून देखील बरेच वातावरण तापले होते. नवजोत सिंग सिद्धू, सुनील गावस्कर, कपिल देव यांना शपथविधी सोहळ्याने आमंत्रण देण्यात आले होते. परंतू सिद्धू यांच्या शिवाय बाकीच्यांनी जाण्याचे टाळले होते.

सिद्धू यांनी त्यावेळी पाकिस्तानचे लष्कर प्रमुख कमर जावेद बाजवा यांची गळाभेट घेतली. या कारणाने भारतात त्याच्यावर बरीच टीका झाली होती. या सगळ्या प्रकरणानंतर सिद्धू यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानचे गोडवे गायल्याने त्यांच्यावर बरीच टीका करण्यात येत आहे.


हे ही वाचा- 

#MeToo :- लैंगिक शोषणाच्या आरोपांची तपासणी करण्यासाठी समितीची नेमणूक करणार- मेनका गांधी


 

Loading...

मुंबईत शिवसेना आमदारावर प्राणघातक हल्ला

Previous article

#MeToo : लैगिंक शोषणाचे आरोप-प्रत्यारोप आणि वास्तव

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *