Royal politicsमहाराष्ट्रमुख्य बातम्या

‘गाजर’वाल्यांच्या विरोधात शिवसेनेचा ‘जागर’

0

पुणे : शहरातील विविध नागरी प्रश्न आणि अपुर्ण योजनांकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेच्यावतीने पुणे महानगरपालिकेवर ‘जागर मोर्चा’काढण्यात आला. संपर्क नेते बाळा कदम यांच्या नेतृत्वाखालील हे आंदोलन केले गेले. ‘पाणी आमच्या हक्काचे; नाही कुणाच्या बापटाचे’ अशा घोषणा देत शिवसैनिकांनी आक्रमक होत महापालिकेच्या आवरात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला.

केंद्रात, राज्यात सत्ता असूनही भाजपा पुणे शहराच्या समस्या सोडवण्यात अपयशी ठरत असल्याचा आरोप करत शिवसेनेने हा मोर्चा काढला तर या मोर्चाची दखल न घेतल्यास आणखी तीव्र लढा उभारला जाईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

Loading...

शनिवारवाडयापासून ते पुणे महापालिकेवर जागर मोर्चा काढण्यात आला. पुणे जिल्हा संपर्कप्रमुख बाळा कदम यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. याप्रसंगी शहर प्रमुख माजी आमदार महादेव बाबर, चंद्रकांत मोकाटे, पुणे महापालिकेतील गटनेते संजय भोसले तसेच आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, केंद्रात आणि राज्यात भाजपाची सत्ता येऊन चार वर्षांचा कालावधी झाला आहे. तसेच पुणे महापालिकेत भाजपाची एक हाती सत्ता येऊन दीड वर्षांचा कालावधी लोटला. मात्र, अजूनही पुणे शहराचे प्रश्न सोडवण्यात भाजपा सरकार अपयशी ठरल्याचा आरोप शिवसेनेने केला.

मोर्चातून शिवसेनेने काय केल्या आहेत मागण्या ?

1) वाहतूक व्यवस्था
2) 24/7 पाणीपुरवठा
3) जुने वाडे व झोपडपट्टी पुनर्वसन योजना
4) कचरा कोंडी
5) नदी सुधारणा प्रकल्प
6) चांदणी चौकातील उड्डाणपूल
7) शिवसृष्टी
8) डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारक सुशोभीकरण
9) बेकायदेशीर होर्डिंग्ज
10) हॉकर्स झोन पॉलिसी
11) पूरग्रस्त वसाहतीच्या नागरिकांना हक्काची घरे

‘दगडूशेठ’ ला तब्बल १२६ किलोच्या माव्याच्या मोदकाचा महानैवेद्य

Loading...

लोडशेडिंगच्या मुद्यावरुन तोडफोड-जाळपोळ झाली तर आम्ही जबाबदार नाही : आव्हाड

Previous article

औरंगाबादमध्ये राष्ट्रवादीचा ‘संविधान वाचवा, देश वाचवाचा’ गजर

Next article

You may also like

Comments

Comments are closed.