Royal politicsटॉप पोस्ट

पुण्यात तुरुंगाच्या जेलरवरच तुरुंगाबाहेर गोळीबार

0

सामान्य लोकांना, तुमच्या जिवाची पर्वा करू नका; पोलिस तुम्हाला पूर्ण संरक्षण देतील असे संगितले जाते. पोलिसांकडून सामान्य लोकांचे संरक्षण केले जाते, परंतू इतरांचे संरक्षण करणार्‍या पोलिसांवरच गोळीबार करण्यात आल्याचे तुम्हाला कळले तर.  हो, ही सत्य घटना आहे जी पुण्यातील येरवडा तुरुंगा बाहेरच घडली.

येरवडा तुरुंगाबाहेरच दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञातांनी येरवडा तुरुंगाचे जेलर असलेल्या मोहन पाटील यांच्यावर तुरुंगाच्या गेट बाहेरच गोळीबार करीत मारण्याचा प्रयत्न केला.  परंतू ते यात थोडक्यात बचावले. त्यांनी आरडाओरडा केल्याने गोळीबार करणारे पसार झाले.

Loading...

आरोपींनी गावठी कट्याने झाडली गोळी- 

येरवडा तुरुंगाचे जेलर असलेल्या मोहन पाटील सकाळी 6.20 च्या दरम्यान तुरुंगाबाहेरील गेट जवळ उभे होते. त्यावेळी दोघेजण  गाडीवर त्यांच्या दिशेने आले आणि काही समजायच्या आता त्यांनी यांच्यावर गोळीबार केला.  यात ते अगदी थोडक्यात बचावले. त्यांनी आरडा ओरडा केल्याने हे आरोपी पसार झाले.

याचे सीसीटीव्ही फुटेज तुरुंगाच्या गेट वर असणार्‍या कॅमेरामध्ये कैद झाले आहे. प्रथमदर्शी आरोपींनी तोंडाला रुमाल बांधला होता. तर,  जेलर मोहन पाटील यांच्यावर आरोपींकडून गावठी कट्याने गोळीबार झाल्याचे समोर येत आहे. घटनास्थळावर तपासत पोलिसांना एक गोळीची पुंगळी देखील सापडली आहे.

घटनेची माहिती जेलर पाटील यांनी लगेचच येरवडा कारागृह प्रशासनाला दिली त्यानंतर तातडीने येरवडा पोलीस घटनास्थळी पोहचले. कारागृह विभागाचे महानिरीक्षक डॉ भूषणकुमार उपाध्याय, पोलीस उपायुक्त दीपक साकोरे, सहायक पोलीस आयुक्त गणेश गावडे यांनी घटनास्थळी पोहचून येरवडा विश्रांतवाडी पोलिसांना तपास करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

येरवडा जेलरवरच तुरुंगाबाहेर गोळीबार झाल्याने आता येरवडा तुरुंग पोलिस कर्मचारी आणि कैद्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यातील अति संवेदनशील तुरुंग म्हणून येरवडा तुरुंगाची ओळख आहे. याच तुरुंगात 26/11 च्या मुंबई बोंम स्फोटातील गुन्हेगार अजमल कसाब शिक्षा भोगत होता आणि त्याला याच तुरुंगात फाशी देण्यात आली.  बॉलीवुड अभिनेता संजय दत्त हा सुद्धा याच तुरुंगात शिक्षा भोगत होता.

या तुरुंगाबाहेरील रस्त्यावर वाहनांची सतत वर्दळ असते.  काही वेळा येथे वाहतूक कोंडी देखील होते. तसेच तुरुंगाच्या गेट वर तुंरुगातील आरोपींच्या नातेवाईकांची सुद्धा कायम गर्दी असते.

Loading...

जम्मू-काश्मिर नंतर या राज्यातील सरकार सुध्दा लवकरच पडू शकते ?

Previous article

पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना ठोठावली 10 वर्षाची तुरुंगवारी

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *