Royal politicsमहाराष्ट्रमुख्य बातम्याशैक्षणिक

वैद्यकिय महाविद्यालय तसेच वैद्यकीय शिक्षणविभागाविरोधात मनविसेची सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका

0

पुणे : राज्यातील खाजगी महाविद्यालय तसेच अभिमत विद्यापीठानी एमबीबीएस ,बीडीएस आदि वैद्यकीय अभ्यासक्रमाचे राखीव एन.आरआय कोटीतील प्रवेश प्रक्रिया राबविताना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचे उल्लघंन केले आहे. यामुळे राज्यातील सर्व खाजगी महाविद्यालय ,अभिमत विद्यापीठ तसेच वैद्यकीय शिक्षण विभागा विरोधात मनविसेचे शहर अध्यक्ष कल्पेश यादव यांनी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.

राज्यातील खाजगी महाविद्यालय अभिमत विद्यापीठ सन 2018-19 या शैक्षणिक वर्षामध्ये राखीव एन आरआय कोट्यातील वैद्यकीय अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया राबविताना सर्वोच्य न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणेच या राखीव जागेतील प्रवेश करावेत अशी मागणी वैद्यकीय शिक्षण संचालकाकडे मनविसे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी केली होती .या मागणीन्वये संचालकांनी सर्व खाजगी महाविदयालय ,अभिमत विद्यापीठांना स्पष्ट आदेश देवून या राखीव NRI जागेतील प्रवेश प्रक्रिया राबविताना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे म्हणजे विद्यार्थी -पालक NRI असेल तर त्या विद्यार्थ्यास प्रथम प्राधान्य द्यावे अथवा विद्यार्थ्याचे नातेवाईक NRI असतील आणि हे नातेवाईक या विद्यार्थ्यांची संपुर्ण फी ही त्यांच्या NRI बॅंकखातेतुन स्पॉंसर करणार असतील तरच अशा विद्यार्थ्यांना या राखीव जागेतील जागेवर प्रवेश द्यावे तसेच विद्यार्थ्यांना प्रवेश देताना गुणवत्तेनुसारच प्रवेश प्रक्रिया राबवावी असे स्पष्ट आदेश देवून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचे उल्लंघन होणार नाही याचीही दक्षता घ्यावी तसेच शैक्षणिक वर्ष २०१७-१८ मधील राखीव जागेतील प्रवेशीत विद्यार्थ्यांची संपुर्ण तपशिलांसह माहिती संकेतस्थळावर प्रदर्शित करावे असे कळविले होते . मात्र, तरीही राज्यातील वैद्यकिय महाविद्यालयांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करत भरमसाठ कॅपिटेशन फी (डोनेशन )घेत इतर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला गेला आहे. ही प्रवेश प्रक्रिया पार पाडतेवेळी म्हणजेच समुपदेशन करतेवेळी वैद्यकीय शिक्षण विभागाचे अधिकाऱ्यांच्या समक्ष असे गैरप्रकार होत या राखीव NRI जागेचे प्रवेश झाले. या प्रकरणी मनविसेचे पुणे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी वैद्यकिय महाविद्यालय आणि राज्य शासनाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल करुन दाद मागितली आहे.

Loading...

याबाबत याचिकाकर्ते मनविसे पुणे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी सांगितले की, वैद्यकिय महाविद्यालयांनी आर्थिक फायद्यासाठी राखीव एन.आर.आय कोट्यातून चुकीच्या पध्दतीने प्रवेश प्रक्रिया राबविली आहे. या प्रकरणी वैद्यकिय शिक्षण संचालयकांकडे दाद मागून ही काही उपयोग झाला नाही. या राखीव NRI जागेतील सर्वोच्च न्यायालयाचे निर्देशाचे उल्लंघन करीत झालेले प्रवेश रद्द करावे यासाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल केली आहे. या राखीवNRI जागेतील प्रवेश रद्द झाल्यास राज्यातील विद्यार्थ्यांकरीता गुणवत्ता यादीनुसार प्रवेश प्रक्रिया राबविता येईल. यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल.

Loading...

भाजपने कितीही चेटूकगिरी केली तरीही राफेलचे भूत इतक्यात खतम होईल असे वाटत नाही : सामना

Previous article

संघ मोदींना बकरा बनवत आहे – प्रकाश आंबेडकर

Next article

You may also like

Comments

Comments are closed.