Royal Entertainmentमुख्य बातम्या

‘पबजी’ च्या जागी आता येणार अक्षयकुमारचा ‘फौजी’!

0

केंद्रसरकारने ‘पबजी’ या लोकप्रिय गेमिंग ऍपबरोबरच चीनच्या तब्बल 118 मोबाईल ऍपवर बंदी घातल्यामुळे पब्जीप्रेमींमध्ये नाराजीचे सूर उमटले होते. मात्र, ‘पबजी’ लाही भारी पडेल असा अस्सल भारतीय बनावटीचा ‘फौजी’ हा गेमिंग ऍप येत्या ऑक्टोबरअखेरीस बाजारात येतोय. विशेष म्हणजे, आपल्या वेगळ्या धर्तीच्या भूमिकांमुळे चर्चेत राहणारा अष्टपैलू अभिनेता अक्षयकुमार हा गेम लाँच करतोय. ही माहिती त्याने शुक्रवारी ट्विटरद्वारे दिली आहे.
आपल्या ट्विटर संदेशात अक्षयकुमार म्हणतो की, ‘ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत अभियानाचे समर्थन करीत Fearless And United-Guards अर्थात FAU-G सादर करताना मला विशेष अभिमान वाटत आहे. या गेमच्या खेळाडूंना मनोरंजनाबरोबरच आपल्या सैनिकांच्या बलिदानाबाबतही माहिती मिळेल. या गेममधून मिळणाऱ्या एकूण उत्पन्नापैकी 20 टक्के उत्पन्न ‘भारत के वीर’ या ट्रस्टला देणगी म्हणून देण्यात येणार आहे.’
पबजी गेमच्या तोडीस तोड ठरू शकणारे फौजी गेम बेंगळुरू येथील एन-कोर गेम्स नावाच्या कंपनीने तयार केले आहे. कंपनीचे सह संस्थापक विशाल गोंडल म्हणतात की, या गेमवर अनेक महिने आम्ही काम केले आहे. या गेमचे पूर्ण नाव ‘फियरलेस अँड युनायटेड गार्डस’ म्हणजेच ‘फौजी’ असे असून गेमचे पहिले लेवल गलवान घाटावर आधारित असेल. गेम लाँच झाल्यावर काही दिवसातच 20 कोटी युजर्स हा गेम डाऊनलोड करतील, अशी कंपनीला अपेक्षा असल्याचेही गोंडल म्हणतात.
गलवान घाटात जून महिन्यात चीनकडून झालेल्या हल्ल्यात 20 भारतीय जवान शहीद झाले होते. तेव्हापासून सीमारेषेच्या मुद्द्यावर भारत-चीनमध्ये तणाव आहे. यावरूनच भारत सरकारने चिनी कंपन्यांच्या 118 मोबाईल ऍप वर बंदी घातली आहे. आता या पार्श्वभूमीवर अक्षयकुमार लाँच करत असलेल्या ‘फौजी’ या मोबाईल गेमचे स्वागत कसे केले जाईल हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
The post ‘पबजी’ च्या जागी आता येणार अक्षयकुमारचा ‘फौजी’! appeared first on Dainik Prabhat.

अक्षय कुमारने लॉच केला “फौजी’ गेम

Previous article

यूपीआय व्यवहारावरील शुल्क बॅंकांकडून रद्द

Next article

You may also like

Comments

Comments are closed.