Royal politicsटॉप पोस्ट

पंतप्रधानांच्या जनसंवाद सभेत शेतकर्‍यांच्या येण्यावर बंदी, राजस्थान सरकारला वाटते शेतकर्‍यांची भीती

0

सध्या वसुंधरा राजे सरकार भलतेच चिंतेमध्ये असल्याचे दिसत आहे. शनिवारी राजस्थान येथे होणार्‍या ‘प्रधानमंत्री लाभार्थी जनसंवाद’ कार्यक्रमात सरकारी योजनाचा लाभ घेणार्‍या लाभार्थीना पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहे.  परंतू राजस्थानच्या वसुंधरा राजे यांना चिंता आहे की, उत्तर राजस्थान मधील हडौती क्षेत्रातील शेतकरी शेतमालाला योग्य हमीभाव मिळाला नाही म्हणून आणि हेच त्यांच्या आत्महत्येचे कारण ठरले असल्याने, कार्यक्रमात येऊन मोदींसमोर घोषणाबाजी करतील. या कारणाने राजस्थान सरकारने कथित स्वरूपाचा अजब फतवाच काढला आहे. हडौती क्षेत्रातील शेतकर्‍यांना सभेला येण्यास बंदी घातली आहे.

हडौती क्षेत्रातील शेतकरी सभेत येऊन आपली ‘मन की बात’ करून नयेत आणि राज्य सरकारचे देशात हसू होऊ नये म्हणून हडौती क्षेत्रातील शेतकर्‍यांना  सभेला येण्यास निषेधच केला आहे. आता हेच  देशात वसुंधरा राजे सरकारच्या हास्याच कारण बनले आहे आणि हेच कारण मोदी सरकारला शेतकर्‍यांविरोधी आहे असे म्हणायला विरोधी पक्षांसाठी पुरेसे ठरणार आहे.

Loading...

खरतर केंद्राकडून आणि राज्यकडून राज्यभरात राबवण्यात येणार्‍या 12 योजनांच्या लाभर्थ्यांना संबोधित करण्यासाठी मोदी शनिवारी जयपूरमध्ये येणार आहेत. सरकार कडून असा दावा करण्यात आला आहे की, या योजनांचा राज्यातील अनेकांना लाभ मिळाला आहे. डिसेंबर महिन्यात येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी भाजप आणि मोदी सरकारकडून आपल्या कामाचा पढा वाचण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

हडौती क्षेत्रातील शेतकर्‍यांवर बंदी घातल्याने सभेला येणार्‍याची संख्या कमी होऊ शकते, यावर उपाय म्हणून राजस्थान मध्ये कर्जमाफी मिळललेल्या शेतकर्‍यांना सभेला घेऊन येण्याची शक्कल राजस्थान सरकारने लढवली आहे.

राजस्थान सरकारने राज्यातील कलेक्टर्स ला आपल्या जिल्ह्यातील शेतकर्‍यांना सभेला आणण्याचे आदेश दिले आहेत. कलेक्टर्सने बारा, बुंदी आणि झालावाड या जिल्ह्यातील शेतकर्‍यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, बहुतेक शेतकर्‍यांनी लसूण आणि हरभर्‍याला सरकारकडून चांगले हमीभाव मिळाले नाहीत. आणि खरेदी केंद्रावर अनेक गडबड चालू असल्याचे संगितले.

यावेळी हडौती क्षेत्रात लसूणचे उत्पादन चांगले झाले आहे, परंतू बाजारात फक्त 2 रुपये प्रति किलो असा लसूणचा भाव गडगडला आहे. असे असेल तरी सरकारकडून 32. 57  रुपये प्रति किलो अशा भावाने लसूण खरेदी केला जाईल अशी घोषणा केली परंतू त्यावर जाचक अटी ठेवल्या आहेत. तसेच खरेदी केंद्रावर खरेदीच्या गडबड झाल्याच्या  अनेक घटना समोर येऊ लागल्या. त्यामुळे हडौती क्षेत्रात शेतकरी चांगलेच संतापले आहेत.

यामुळे प्रधानमंत्री लाभार्थी जनसंवाद’ कार्यक्रमात शेतकर्‍यांना  बोलावणेच राजस्थान सरकारला अवघड झाले आहे. यामुळे सभेला गर्दी करण्यासाठी सरकारकडून पूर्ण प्रयत्न केले जात आहेत.

Loading...

Fanney Khan trailer :- स्वतः मोहम्मद रफी बनू न शकलेल्या बापाला आपल्या मुलीला लता मंगेशकर बनवायचयं

Previous article

जम्मू-काश्मिर नंतर या राज्यातील सरकार सुध्दा लवकरच पडू शकते ?

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *