मुख्य बातम्या

राज्यातील ‘या’ भागात जोरदार पावसाची हजेरी

0

पूर्व मुंबई उपनगरांत सकाळपासून वातावरण ढगाळ होतं. संध्याकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. त्यामुळे गेले काही दिवस उन्हाच्या झळा सोसणाऱ्या मुंबई उपनगरातील रहिवाशांना काहीसा दिलासा मिळाला.
बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे सध्या मुंबई आणि उपनगरांमध्ये पुढील आठवडाभर अशीच परिस्थिती राहणार आहे. पूर्व मुंबई उपनगरात मुलुंड, भांडूप, कांजुरमार्ग, विक्रोळी, घाटकोपर परिसरात संध्याकाळच्या दरम्यान पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे हवेतही गारवा निर्माण झाला होता.
काही दिवसांच्या विश्रांतीनंतर नवी मुंबईतही पावसाने जोरदार हजेरी लावली. विजांच्या गडगडाटासह जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. काही भागात वीजही गायब असून घराबाहेर पडलेल्या नागरिकांची अचानक आलेल्या पावसामुळे चांगलीच तारांबळ उडाली आहे.
काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा एकदा बुलढाणा जिल्ह्यामध्ये सर्वदूर हजेरी लावली आहे. मुसळधार पडणाऱ्या पावसाने नदी-नाले दुथडी भरुन वाहत आहेत. गाव खेड्यांमध्ये जाणारे रस्ते चिखलमय झालेत तर दुसरीकडे शेतातल्या उभ्या पिकांमध्ये पाणी शिरल्याने येणारा घास हिरावतोय की अशी चिंता बळीराजाला सतावतेय. बऱ्यापैकी आलेल्या सोयाबीन, मूग, उडीद या पिकांनाही मुसळधार पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे.
 
महत्वाच्या बातम्या :-

पुढे काय? दाऊदला पालिकेचे टेंडर अन् पाकिस्तानसोबत टक्केवारी? भाजपचा सेनेवर हल्ला
कंगना सोडून आता कोरोनाकडे लक्ष द्या ; फडणवीसांचा ठाकरे सरकारला सल्ला
संजय राऊतांनी मला उघड धमकी दिलीय ; कंगनाचा गंभीर आरोप
सूड बुद्धीने ठाकरे सरकार कंगनावर कारवाई करत आहे का ?
धनंजय मुंडेंनी घेतला कंगनाच्या वक्तव्याचा समाचार , म्हणतात..

 
inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. राज्यातील ‘या’ भागात जोरदार पावसाची हजेरी InShorts Marathi.

कंगना रनौत कुटुंबासह करणार भाजपमध्ये प्रवेश ?

Previous article

फडणवीसांनी राज्यपालपदाची ऑफर दिली होती ; खडसेंचा मोठा गौप्यस्फोट

Next article

You may also like

Comments

Comments are closed.