Royal politicsटॉप पोस्ट

प्रणब मुखर्जी यांच्या आधी ह्या व्यक्ति देखील उपस्थित राहिल्यात संघाच्या कार्यक्रमात

0

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून आयोजित करण्यात आलेल्या तृतीय वर्षाच्या प्रशिक्षण वर्गाच्या समारोहाला माजी राष्ट्रपती  प्रणब मुखर्जी प्रमुख आतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे. आज होणार्‍या या कार्यक्रमात संघाच्या मंचावरून माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी नक्की काय बोलतात हे पाहणे कॉंग्रेससाठी आणि सामान्यांसाठी महत्वाचे ठरेल.

माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्याकडून आलेले कार्यक्रमासाठी निमंत्रण स्वीकारल्यानंतर त्यांच्यावर राजकीय स्तरावर बरीच टीका करण्यात आली. सोशल मीडियावर  देखील त्यांना टीकेचा सामना करावा लागला.

Loading...

कॉंग्रेसकडून यावर अजून कोणतेही वक्तव्य करण्यात आले नसले तरी प्रणब मुखर्जी यांच्या मुलीने त्यांच्या या कार्यक्रमात सहभागी होण्याबाबत ट्विटर वर नाराजी व्यक्त केली आहे.“आज घडणार्‍या घटनेवरून भाजप याचे राजकारण करीत आहे याची तुम्हाला कल्पना आली असेल अशी अपेक्षा, तुमचे आजचे भाषण विसरले जाईल, ते फक्त व्हिडिओ स्वरुपात राहतील. त्याला खोटी वक्तव्य जोडून ते व्हिडिओ वायरल केले जातील.” असा भाजपवर आरोप करीत शर्मिष्ठा मुखर्जी यांच्याकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. “नागपूरला जाऊन तुम्ही भाजप ला खोट्या बातम्या आणि अफवा पसरवण्याची संधी देत आहात” असे देखील ट्विट त्यांच्याकडून करण्यात आले.

याआधी संघ शिबिरात अथवा संघाच्या कार्यक्रमात सहभागी झालेले व्यक्ती-

१९३४ मध्ये महात्मा गांधीं देखील वर्ध्याच्या संघ शिबिरात उपस्थित राहिले होता. यावेळी त्यांनी देशाच्या भवितव्य बद्दल संघ संस्थापक हेगडेवर यांच्याशी चर्चा देखील केली होती.

याशिवाय संघच्या कार्यक्रमांमध्ये जयप्रकाश नारायण देखील सहभागी झाले होते. ३ नोव्हेंबर १९७७ ला त्यांनी पाटणा येथे संघाच्या एका शिक्षा वर्गाला देखील संबोधित केले होते.

संघाच्या एका कार्यक्रमात माजी राष्ट्रपती जाकीर हुसैन देखील सहभागी झाले होते.

राजकीय नेत्यांशिवाय रतन टाटा यांनी देखील संघाचे कामकाज समजून घेण्यासाठी संघ मुख्यालयाला भेट दिली होती. तसेच माजी जनरल फील्ड मार्शल करियप्पा हे १९५९ साली संघ शाखेच्या कार्यक्रमात येऊन गेले आहेत.

याशिवाय संघच्या कार्यक्रमांमध्ये बौद्ध धर्मगुरू दलाई लामा, माजी राज्यसभा सदस्य राजाभाऊ खोब्रागडे हे देखील उपस्थित  राहिले आहेत.

या आधी २०१४ मध्ये संघ प्रशिक्षण वर्गाच्या समारोहाला श्री श्री रविशंकर (संस्थापक-आर्ट ऑफ लिविंग फाऊंडेशन), तर २०१७ रोजी जनरल रूकमंगुद कातवल (नेपाळचे माजी आर्मी जनरल) हे देखील उपस्थित होते.

Loading...

आतकंवादी संघटनांमध्ये भरती होणाऱ्या काश्मिरी तरूणांविषयी असलेला हा रिपोर्ट आश्चर्यकारक आहे

Previous article

VIDEO: संघाचा कार्यक्रम सुरु होताच कॉंग्रेसकडून ट्विट करत संघावर आरोप

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *