Royal Entertainmentमुख्य बातम्या

वन विकासासाठी ‘प्रभास’ने केली तब्बल इतके कोटींची मदत

0

मुंबई-   चित्रपटसृष्टीत बाहुबलीच्या प्रचंड यशानंतर अभिनेता प्रभासने अनेक चित्रपटामधून   प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माणकेले आहे. प्रभास  ऍक्‍शन पॅक  चित्रपटांमुळे तो नेहमीच चर्चेत असतो. मात्र यावेळी चित्रपटांमुळे नाही तर निसर्गप्रेमी म्हणून तो सोशल मीडियावर चर्चेत आला आहे . अभिनेता प्रभासने पुढाकार घेत हैदराबादजवळील काझिपल्ली आरक्षित वनातील 1650 एकर क्षेत्र दत्तक घेतले आहे आणि त्याचा विकास करण्याची जबाबदारी घेतली आहे. त्यांने या राखीव जंगलाच्या विकासासाठी दोन कोटी रुपये वन अधिकाऱ्यांना देऊ केले आहेत. प्रभासने स्वत: इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.

 

View this post on Instagram

 
I’ve taken the initiative to adopt and develop 1650 acres of Kazipalli Reserve Forest Block near Hyderabad. Having always been a nature lover, I believe this would create an additional lung space for the city. I thank Rajya Sabha MP @mpsantoshtrs for his support. I would also like to thank the Govt of Telangana and Forest Department for giving me this opportunity! #GreenIndiaChallenge
A post shared by Prabhas (@actorprabhas) on Sep 7, 2020 at 6:38am PDT

इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत याबाबत माहिती दिली आहे की,’मी निसर्गप्रेमी या नात्याने माझा असा विश्वास आहे की    हैदराबादजवळील काझिपल्ली राखीव वनक्षेत्रातील विकासामुळे शहरासाठी एक ‘Lung Space’ तयार होईल. मी राज्यसभा खासदार संतोष कुमार यांचे त्यांच्या सहकार्यासाठी आभार मानतो. त्याचप्रमाणे तेलंगणा सरकारचे आणि वनविभागाचेही मला ही संधी देण्यासाठी मी आभार मानू इच्छितो.’
The post वन विकासासाठी ‘प्रभास’ने केली तब्बल इतके कोटींची मदत appeared first on Dainik Prabhat.

तेलगू अभिनेते जयप्रकाश रेड्डी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Previous article

सुशांतच्या बहिणीने रिया चक्रवर्तीला लगावला खोचक टोला म्हणाली,…

Next article

You may also like

Comments

Comments are closed.