Royal Entertainmentमुख्य बातम्या

पूजा करताना महिलांनी करावे ही 5 कामे, देवीच्या आशिर्वादाने होतील सर्व इच्छा पूर्ण!!

0

हिंदू धर्मात लक्ष्मी देवीला धनाची, वैभवाची आणि संपन्नतेची देवी मानले जाते. शुक्रवारच्या दिवशी आपण देवी लक्ष्मीच्या ज्या रुपाची पूजा करतो त्यास वैभव लक्ष्मी असे म्हणले जाते. बऱ्याच महिला आपल्या इच्छापूर्तीसाठी, सुखासाठी आणि धनलाभासाठी शुक्रवारच्या दिवशी वैभव लक्ष्मीचे व्रत करतात. जर तुम्ही देखील हे व्रत करत असाल तर वैभव लक्ष्मीच्या पुजेदरम्यान काही गोष्टींचे तुम्ही विशेष ध्यान ठेवले पाहिजे.
पुजेमध्ये असावे लाल फुल- पुराणांनुसार लाल रंगाचे फुल हे लक्ष्मी देवीला खूप प्रिय असते. हेच कारण आहे की जेव्हा तुम्ही शुक्रवारच्या दिवशी वैभव लक्ष्मीची पूजा कराल तेव्हा त्या पूजेमधे लाल फुल सामील करा. लाल फुलांमध्ये तुम्ही लाल गुलाब किंवा लाल जास्वंद इत्यादी फुलांचा उपयोग करू शकता. तथापि, देवी लक्ष्मी यांना कमळाचे फुल हे अधिक प्रिय असते परंतु ते नाही भेटले तर तुम्ही गुलाबाचा उपयोग करू शकता. जेव्हा पूजा पूर्ण होऊन जाईल तेव्हा तो गुलाब पैसे ठेवण्याच्या जागी ठेवून द्यावा. यामुळे तुमची प्रगती होईल. हे फुल दररोज बदलायला विसरू नका.
या वस्तू देखील करा सामील- लाल चंदन, गंध, लाल वस्त्र आणि कापूर यांसारख्या गोष्टींचा वापर देखील वैभव लक्ष्मीच्या पूजेत आवश्य करावा. पूजा घरात मूर्ती अशी स्थापित करावी ज्यामध्ये लक्ष्मी देवी या उभ्या असतील आणि धन देत असतील. विशेषत: कर्क, वृश्चिक आणि मीन राशीच्या लोकांसाठी ऐश्वर्य लक्ष्मीची पूजा ही लाभकारी असते.
नैवद्यासाठी करा खीर अर्पण- वैभव लक्ष्मीच्या पूजेमध्ये गाईच्या दुधापासून खीरीचा भोग लावला पाहिजे. असे म्हणले जाते की खीरीमध्ये असलेल्या अक्षतापासून अक्षय फळाची प्राप्ती होते. असे केल्याने पूजा करणाऱ्या व्यक्तीस धनाची कमतरता नाही पडत. तांदळाला देखील नष्ट न होणारे धान्य मानले जाते. हेच कारण आहे की प्रत्येक धार्मिक कार्यात याचा वापर केला जातो.
श्रीयंत्र देखील ठेवा- वैभव लक्ष्मीच्या पूजेत श्रीयंत्र हे आवश्य ठेवा. तुम्ही श्रीयंत्राच्या पुजेपासूनच सुरुवात केली पाहिजे. यानंतरच देवी लक्ष्मीची बाकी विधी विधानाने पूजा केली पाहिजे. पुजेनंतर वैभव लक्ष्मीची व्रत कथा वाचली पाहिजे. यानंतर गोघृताने दिवा प्रज्वलित करून आरती करावी आणि देवीसमोर खाली वाकून आशिर्वाद घ्यावा. लक्षात ठेवा तुम्हाला देवी लक्ष्मी समोर तीन दिवे लावायचे आहेत.
नाणे देखील आहे महत्त्वाचे- वैभव लक्ष्मीच्या पूजेमधे नाण्याचा वापर देखील आवश्यक मानला गेला आहे. तुमची प्राथमिकता गणेश आणि देवी लक्ष्मी यांच्या प्रतिमेचे चांदीचे नाणे पाहिजे. तथापि, ते नसल्यास सामान्य नाणे देखील गंगाजलाने धुवून वापरता येऊ शकते.
पूजा झाल्यानंतर या नाण्यांना दान केले पाहिजे. हे दान तुम्ही मंदिरात देखील करू शकता किंवा एखाद्या सौभाग्यावती स्त्रीला उपहार स्वरूप देऊ शकता.जर तुम्ही वैभव लक्ष्मीच्या पूजेत यासर्व गोष्टींचे ध्यान ठेवत असाल तर देवी लक्ष्मी तुमची मनोकामना लवकरात लवकर पूर्ण करेल.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
The post पूजा करताना महिलांनी करावे ही 5 कामे, देवीच्या आशिर्वादाने होतील सर्व इच्छा पूर्ण!! appeared first on Tadka Marathi.

अनेक वर्षानंतर नीना गुप्तांचे दुःख आले बाहेर, म्हणाल्या – विवाहित पुरुषांशी कधीच करू नका प्रेम नाहीतर…

Previous article

ह्या 6 राशीच्या लोकांनी राहा बर्फी वाटायला तयार, देवीच्या आशीर्वादाने मिळणार धन आणि मोठी खुशखबर

Next article

You may also like

Comments

Comments are closed.