Royal politicsटॉप पोस्ट

राज्यसभेत ‘उपसभापतीं’च्या पदासाठी भाजप आणि विरोधकांमध्ये कडा मुकाबला, निवडणूक 9 ऑगस्टला

0

देशात अनेक घटना घडत असताना केंद्रातील सरकारला खिंडीत घठण्याचा प्रयत्न राज्यसभा उपसभापतीपदासाठी विरोधकांकडून करण्यात येईल का असा सवाल आता उपस्थिती होत आहे. ती संधी येत्या 9 ऑगस्टला चालून आली आहे. राज्यसभेच्या उपसभापती पदाच्या जागेसाठी 2 दिवसांनी निवडणूक घेणार असल्याचे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष असलेल्या वैंकया नायडू यांनी घोषणा केली आहे.

भाजप करेल का मित्रपक्षांची नाराजी दूर ?

9 ऑगस्ट ला होणार्‍या या उपसभापतींच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलाच मुकाबला होणार असे दिसत आहे. सत्ताधारी भाजप कोणत्याही परिस्थितीत या पदावरचा हक्क सोडू शकत नाही आणि तसा विचार तर करणार देखील नाही. भले की एनडीए मधील काही मित्रपक्ष नाराज असतील तरी काहींना काही प्रलोभने दाखवून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न भाजप नक्कीच करणार.. 

Loading...

उपसभापती  पी जे कुरियन यांचा कार्यकाल 20 जून मध्ये संपल्यानंतर मान्सून सत्रात नव्या उपसभापतींची निवडणूक घेण्यात येईल असे स्पष्ट होते.

विरोधकाचे मनोबल खरच वाढलय का ?

फुलपूर आणि गोरखपुर या  भाजप शासित उत्तरप्रदेशातील लोकसभेच्या पोट निवडणुकीत विरोधी पक्षांनी एकत्र येत भाजप ला त्यांच्याच किल्ल्यात धूळ चाखावली होती, त्यानंतर विरोधी पक्षात एकत्र येऊन आपण भाजप ला रोखू शकतो असे मनोबल तयार झाले होते. त्यानंतर कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत देखील ‘कॉंग्रेस’ने आणि ‘जेडीएस’ने भाजप आला राज्यात सत्तेत येण्यापासून रोखले होते. त्यामुळे विरोधी पक्षांचे सरकार विरोधात मोट बांधण्याचे प्रयत्न करण्यास सुरुवात झाली आहे. लोकसभेच्या निवडणुकीची आणि विरोधी पक्ष खरच एकत्र येतील का याची ही राज्यसभा उपसभापतींची निवडणूक रंगीत तालीम असणार आहे असे म्हणाले तर वावगे ठरणार नाही.

एनडीए चा उपसभापती पदाचा उमेदवार जाहीर-

उपसभापती निवडणुकीसाठी एनडीए कडून जेडीयू चे हरिवंश उमेदवार असतील असे चर्चेत आहे. हरिवंश हे बिहार मधील बरच प्रसिद्ध पत्रकार आहेत, त्यांनी प्रभात खबर या वृत्तपत्रामध्ये संपादक पदावर काम देखील केले आहे.  असे असले तरीही विरोधी पक्षांकडून आपला उपसभापती  पदाचा उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. या पदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्ष संगनमताने निर्णय घेऊन आपला उमेदवार जाहिर करतात की फुटफुट होते हे पाहणे आता गरजेचे ठरेल. आणि भाजप देखील काही आमिष दाखवून निवडणुकीवेळी काही चालबाजी करेल का? आणि विरोधी मत फोडेल का?  हा देखील उत्सुकतेचा विषय ठरणार आहे.

विरोधी पक्षांचा उपसभापती पदाचा उमेदवार ‘राष्ट्रवादी’चा असे का ?

कारण या उपसभापतींच्या निवडणुकीत ममता बॅनर्जीच्या तृणमूल कॉंग्रेस च्या उमेदवारला उतरवणार अशी संभावना होती परंतू टीएमसी ने आपण या निवडणुकीपासून लांबच राहणार असल्याचे संगितले आहे. कॉंग्रेसकडून देखील यावर अजून कोणतीही स्पष्टता देण्यात आली नाही. अशी चर्चा देखील आहे की महाराष्ट्रातील शरद पवार यांच्या नॅशनल कॉंग्रेस पार्टी (राष्ट्रवादी) कडे ही उमेदवारी जाऊ शकते, तसेच या निवडणुकीत असाच उमेदवार विरोधी पक्षांकडून उतरवला जाऊ शकतो ज्याला सगळ्या विरोधी पक्षांची सहमती असेल. 

अनेक वर्षाच्या परंपरेनुसार जास्तीत जास्त वेळा राज्यसभेच्या उपसभापती पदावर सत्ताधारी पक्षाचाच उमेदवार बसवला जातो. परंतू यावेळी या परिस्थिती या पदासाठी काय रसीखेच असणार हे निवडणुकीच्या दिवशीच ठरेल,

राज्यसभेत एकूण 245 खासदार आहेत, यात ‘एनडीए’कडे 115 जागा असून त्यात सगळ्यात जास्त जागा भाजपकडे (73) आहेत. ‘यूपीए’कडे एकूण 113 खासदार आहेत. त्यात कोंग्रेसकडे 50 खासदार आहेत. तर अन्य पक्षांकडे 17 खासदार आहेत. यामध्ये जे पक्ष कोणत्याही युतीचा भाग नाहीत ते विशेष भूमिका नुभवणार आहेत, कारण अशा पक्षांकडे एकूण 79 जागा आहेत. आणि उपसभापतीच्या अटीटतटीच्या निवडणुकीत जिंकून येण्यासाठी 122 हा जादुई आकडा मिळवणे गरजेचे आहे.  असे  कोण तरी या निवडणुकीत भाजपकडे झुकते माप असल्याचे प्रथमदर्शी दिसते आहे. परंतू विरोधी पक्षांना   एकीचे बळ दाखवण्याची ही नामी संधी आहे. यावरून लोकसभेच्या निवडणुकीत विरोधी पक्ष एकत्र येतील का? आणि भाजपचा रथ रोखतील का?  हे ठरणार आहे.

Loading...

जम्मू-काश्मीरच्या लोकांना विशेष दर्जा देणारे आर्टिकल 35 A नक्की आहे तरी काय ? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Previous article

अरे बापरे! एक मासा विकला 5 लाखाला, मासेमार झाला 20 मिनिटात मालामाल

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *