Royal politicsटॉप पोस्ट

ममता बॅनर्जीची अनेक दिग्गज नेत्यांना भेट, आसाममधील ‘एनआरसी’ प्रश्नावर चर्चा

0

आसाममध्ये नॅशनल रजिस्टर सिटिजन (NRC) च्या मुद्यावरून देशातील राजकारण चांगलेच पेटले असताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या एनआरसी ड्राफ्ट संबंधित चर्चा करण्यासाठी अनेक दिग्गज नेत्यांची भेट घेतली.

काय आहे राष्ट्रीय नागरिक रजिस्टर (NRC) ?

आसाम भारतातील एकमात्र असे राज्य जेथे राष्ट्रीय नागरिक रजिस्टर प्रक्रिया राबवली जाते. एनआरसी अशी प्रक्रिया आहे जेथे अप्रत्यक्ष पध्दतीने म्हणजेच अवैध पध्दतीने राहणाऱ्या विदेशी नागरिकांची तपासणी केली जाते व खरे भारतीय नागरिक कोण हे प्रयत्न केला जातो. जर कोणी आसामचा नागरिक असेल आणि तो जर देशातील इतर राज्यांमध्ये काम करत असेल तर त्याने देखील एनआरसी प्रक्रियेत आपले नाव समाविष्ट करणे गरजेचे आहे.

Loading...

24 मार्च 1971 च्या आधीपासूनच्या तेथील नागरिकांना आपण आसाममध्ये राहत होतो, याचा पुरावा सादर करणे गरजेचे आहे.

याच कारणाने  ममता बॅनर्जी यांनी चर्चा करण्यासाठी कॉंग्रेसचे नेते अहमद पटेल यांची संसदेत भेट घेतली. 

या नंतर दिल्लीत ममता बॅनर्जी यांनी भाजपचे जेष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांची देखील भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली, तसेच यांनी त्यांच्या तबेतीची देखील विचारपुस केली. आणि त्यांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद देखील घेतले. 

शेजारी नखुश असतील तर आपल्याला आवाज ओठवला पाहिजे-

एनआरसी ड्राफ्ट बाबत आपले मत मांडताना म्हणल्या की, आम्ही या बद्दल शांत राहू शकत नाही, आसाम आणि बंगाल ची सीमा एक आहे, मग जर शेजारील राज्य त्रासात असेल तर आपले कर्तव्य नाही का की आपण त्यांच्या  त्रासाबद्दल आवाज उठवला पाहिजे.

संसदेत शिवसेना चे खासदार संजय राऊत यांची देखील भेट घेत त्यांच्याची एनआरसी संबंधित चर्चा केली. यानंतर यांनी माजी मुख्यमंत्री  एच डी देवेगौडा यांची भेट घेतली. याच वेळी त्यांनी दिल्लीत कोंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची भेट घेऊन एनआरसी ड्राफ्ट प्रकरणी चर्चा केली. 

त्यांनी यशवंत सिन्हा आणि शत्रुघ्न सिन्हा यांनी देखील भेट घेतली आणि एनआरसी च्या मुद्द्या बद्दल आपले मत मांडले, एवढेच आणि तर त्यांनी यशवंत सिन्हा आणि शत्रुघ्न सिन्हा यांनी विनंती केली आहे की त्यांनी एक टीम आसाम मध्ये पाठवावी आणि एनआरसी ड्राफ्ट ची परिस्थिती जाणून घ्यावी. 

त्यांनी भाजप वर असा देखील आरोप केला की भाजप या सगळ्या गोष्टी यासाठी करत आहे कारण त्यांना 2019 च्या निवडणुकीत सत्तेवर याचे आहे.

 

 

Loading...

आसाममध्ये ‘एनआरसी’मुळे 40 लाख लोकांचा ‘मतदानाचा हक्क’ नाकारला जाऊ शकतो?

Previous article

Pakistan election:- इमरान खान यांच्या शपथविधी सोहळ्याला हे अभिनेते आणि क्रिकेटर राहणार उपस्थित?

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *