Royal politicsटॉप पोस्ट

Pakistan election:- इमरान खान यांच्या शपथविधी सोहळ्याला हे अभिनेते आणि क्रिकेटर राहणार उपस्थित?

0

इमरान खान हे लवकरच पाकिस्तानच्या पंतप्रधान पदाची शपथ गृहण करणार असून, त्यासाठी कोण कोण पाहुणे बोलवायचे याची चर्चा चालू असताना पंतप्रधान मोदींनंतर आता अभिनेता अमीर खान, माजी क्रिकेट पटू नवजोत सिंह सिद्धू, सुनील गावस्कर, कपिल देव यांसारख्या अनेक भारतीयांना  शपथविधी सोहळ्याला आमंत्रित करण्यात आले आहे.  येत्या 11 ऑगस्टला इमरान खान पाकिस्तान चे पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहे.

नवजोत सिंह सिद्धू यांनी इमरान खान यांनी पाठवलेले आमंत्रण शपथविधी सोहळ्याचे आमंत्रण स्वीकारले आहे. तसेच इमरान खान त्यांची स्तुती भरभरून स्तुती देखील त्यांनी केली. 

Loading...

पाकिस्तानात 25 जुलै ला पार पाडलेल्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर इमरान खान यांचा तहरीक- ए–इंसाफ (पीटीआय) हा पक्ष नॅशनल असेंबली च्या निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला.  त्यानंतर इमरान खान यांनी येत्या 11 ऑगस्टला शपथ घेणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. सत्ता स्थापनेसाठी लागणारे बहुमत पीटीआय कडे नसले तरी ही तारीख इमरान खान यांच्याकडून जाहीर करण्यात आली आहे.

 पीटीआय ला एकूण 115 जागांवर विजय मिळवता आला आहे. असे असले तरीही सरकार स्थापन करण्यासाठी 172 चा जादुई आकाडा मिळवणे गरजेचे आहे. परंतू पीटीआयकडे यासाठी बहुमत नाही.

तर पाकिस्तानातील इतर महत्वाचे पक्ष असलेले पीएमए एल या पक्षाला 64 तर पीपीपी ला 48 जागा मिळवण्यात यश आले आहे. पाकिस्तानच्या नॅशनल असेंबली मध्ये एकूण 342 सभासद असतात, आणि 272 जागांसाठी निवडणूक लढवली जाते.

इमरान खान याच्या पीटीआय पक्षाच्या सर्वात जास्त जागा निवडून आल्यानंतर आता पंतप्रधानपदाची शपथ घेण्यासाठी आयोजित सोहळ्यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित करण्यात येणार आहे. या शपथविधी सोहळ्याला सार्क राष्ट्राच्या देशांना देखील आमंत्रित केले जाऊ शकते.

पाकिस्तानचे भावी पंतप्रधान इमरान खान यांना पंतप्रधान मोदींच्या शुभेच्छा-

एक क्रिकेटर ते भावी पंतप्रधान अशी मजल मारलेल्या इमरान खान यांना भारताचे पंतप्रधान मोदी यांनी निकाल लग्ल्यानंतर फोन करून शुभेच्छा दिल्या. तसेच इमरान खान त्याच्या नेतृत्वात पाकिस्तानात लोकशाहीची मुळे मजबूत होतील अशी आशा देखील त्यांनी बोलून दाखवली. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार पंतप्रधान मोदींनी ते भारताच्या शेजारील देशांबरोबर शांती आणि विकास साधू इछितात असे देखील इच्छा व्यक्त केली.

आता हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल की भारतातील आमंत्रित करण्यात आलेल्या या प्रसिद्ध व्यक्तींपैकी किती जण इमरान खान यांचे निमंत्रण स्वीकारून त्यांच्या शपथविधी सोहळ्यात सहभागी होतात. आणि जर झाले तर त्यावरून कसे राजकारण पेटते.

Loading...

ममता बॅनर्जीची अनेक दिग्गज नेत्यांना भेट, आसाममधील ‘एनआरसी’ प्रश्नावर चर्चा

Previous article

Mulk Movie Review In Marathi : हिंदू की मुस्लिम ? ते की आम्ही ? तापसी पन्नू आणि ऋष‍ि कपूर स्टारर ‘मुल्क’ सांगतोय हा देश कोणाचा?

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *