Royal politicsटॉप पोस्ट

आसाममध्ये ‘एनआरसी’मुळे 40 लाख लोकांचा ‘मतदानाचा हक्क’ नाकारला जाऊ शकतो?

0

आसाममध्ये सुरू झालेल्या नॅशनल रजिस्टर सिटिजनच्या यादीत तब्बल 40 लाख लोकांची नावे आहेत. यामुळे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप दोषारोप सुरू असताना राजकारण चांगलेच तापले आहे.  असे असताना निवडणूक आयुक्त ओपी रावत यांनी संगितले आहे की, जे 40 लाख लोक या यादीत समाविष्ट नाहीत त्यांना मतदान करता येणार नाही असे म्हणले तर घाई केल्यासारखे होईल. कारण त्यातील अनेक जण अजून 18 वर्षाचे देखील नसतील.

एनडीटीव्ही च्या वृत्तानुसार ज्या लोकांची नावे एनआरसी च्या यादीत नाहीत त्यांनी चिंता करण्याची गरज नाही, ते येणार्‍या 2019 च्या निवडणुकीसाठी मतदान करू शकतात. अट एवढीच आहे की, त्यांच्याकडे वोटर आयडी कार्ड असणे गरजेचे आहे. 

Loading...

निवडणूक आयुक्त ओपी रावत यांनी मतदान यंत्रणांना सूचना दिली आहे की, त्यांनी सगळ्या योग्य मतदारांची नावे मतदान यादीत समाविष्ट करावीत. ‘कोणीही मतदार मागे राहणार नाही’  हे लक्ष ठेऊन आसाम च्या मुख्य निर्वाचित अधिकार्‍यांना सूचना दिल्या आहेत की एनआरसी च्या राज्यसमन्वयक यांच्या बरोबर चर्चा करून हे निश्चित केले जावे की योग्य मतदारांना मतदार यादीत समाविष्ट केले जावे.

याच प्रकारे अंतिम मतदार यादी 4 जानेवारी 2019 ला जाहीर केली जाईल. आणि त्याचा वापर येणार्‍या लोकसभा निवडणुकीवेळी केला जाईल. त्यांनी असे देखील संगितले की, आसाम मुख्य निर्वाचित अधिकारी एनआरसीचा रिपोर्ट आल्यावर त्याचा अनेक टप्प्याचा विचार करून एक रिपोर्ट तयार करण्यात येईल.

हे ही वाचा- 

आसाममधील 40 लाख लोक होऊ शकतात बेघर? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Loading...

pakistan election:- पंतप्रधान नरेंद्र मोदी जातील का ‘इमरान खान’च्या शपथविधी सोहळ्याला?

Previous article

ममता बॅनर्जीची अनेक दिग्गज नेत्यांना भेट, आसाममधील ‘एनआरसी’ प्रश्नावर चर्चा

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *