टॉप पोस्टराजकारण

रद्द झालेल्या पासपोर्टने नीरव मोदी करतोय परदेश वाऱ्या

0

हिरे व्यापारी व पंजाब नॅशनल बॅकेच्या घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदी हा ब्रसेल्सला पळून गेला आहे. सीबीआईने इंटरपोलला नीरव मोदी व त्याचा भाऊ निशाल मोदी यांच्या विरोधात रेड काॅर्नर नोटीसा जारी करण्याची मागणी केली होती.  त्यामुळेच नीरव मोदी हा ब्रिटनमधून विमानाद्वारे ब्रसेल्सला पळून गेल्याचे सांगितले जात आहे.

मागीस आठवड्यातच नीरव मोदी लंडनमध्ये राजकीय आश्रय घेण्याच्या तयारीत असल्याचे  वृत्त आले होते. वृत्तानुसार भारतीय मंत्रालय ब्रिटनच्या सरकारशी नीरव मोदी विषयीची चौकशी करत होते. कदाचित याच कारणामुळे नीरव मोदी पळून गेला असेल.

Loading...

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, नीरव मोदी भारताच्या नाही तर सिंगापूरच्या पासपोर्टचा वापर पळून जाण्यासाठी करत आहे. वृत्तानुसार 31 मार्च नंतर नीरव मोदीच्या पासपोर्टवर कुठेही जाण्याची नोंद दिसत नाही. याचाच अर्थ की, नीरव मोदी भारताच्या पासपोर्टचा वापर करत नाहीये. वृत्तात हे देखील म्हटले आहे की, जर नीरव मोदी सिंगापूरचा पासपोर्ट वापरत असेल तर या विरोधात भारत सरकार काहीच करू शकत नाही.  भारत सरकार फक्त या बाबतीत सिंगापूरच्या सरकारवर दबाव आणू शकते.

हे ही वाचा – पीएनबी घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदीला पाहिजे ब्रिटनमध्ये राजकीय आश्रय – रिपोर्ट

तसेच, एका उच्च भारतीय अधिकाऱ्याने सांगितले की, कदाचित नीरव मोदी नकली भारतीय पासपोर्टचा देखील वापर करू शकत असेल. कदाचित दुसऱ्या देशाना याची माहिती नसेल म्हणून तो रद्द झालेल्या पासपोर्टने देखील प्रवास करत असेल.

काही दिवसापुर्वी इंडियन एक्सप्रेस दिलेल्या वृत्तानुसार,भारत सरकारने रद्द केलेल्या पासपोर्टनेच नीरव मोदीने आतापर्यंत तीन देशांचा प्रवास केला आहे. वृत्तानुसार इंटरपोलने भारतीय यंत्रणाना सांगितले आहे की, नीरव मोदी भारतीय पासपोर्टचा वापर करून तीन देशांचा चार वेळा प्रवास करून आला आहे. त्यामुळे प्रश्न असा पडतो की, रद्द केलेल्या पासपोर्टने नीरव मोदी दुसऱ्या देशाचा प्रवास कसा करत आहे ?

याशिवाय पीएनबी घोटाळ्या प्रकरणी पोलिसांनी 25 लोकांवर आरोपपत्र दाखल केले आहे. यामध्ये नीरव मोदी शिवाय त्याचा मामा मेहूल चोकसी, पीएनबीची माजी प्रमुख उषा अनंतासुब्रमण्यम बरोबर आणखी दोन कार्यकारी संचालकांचा समावेश आहे.

नीरव मोदीने लेटर आॅफ अंडरटेकिंगच्या मदतीने हाॅगकाॅगच्या पाच नकली कंपनीच्या मदतीने हा घोटाळा केला असल्याचे म्हटले जाते. हा 13 हजार कोटींचा घोटाळा असून . भारताच्या बॅंकिग क्षेत्रातील हा आजपर्यंतचा सर्वात मोठा घोटाळा मानला जातो.

तसेच नीरव मोदी हा फेब्रुवारी महिन्यापासुन फरार आहे.

Loading...

अरविंद केजरीवाल यांचे पंतप्रधान मोदींना पत्र, आयएएस अधिकार्‍यांचा संप मागे घेण्याची मागणी

Previous article

IND vs AFG : धवन – विजयचे शानदार शतक, पहिला दिवस बरोबरीत

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *