Royal politicsटॉप पोस्ट

‘मी भीक मागतो, आम्हाला मदत करा; अन्यथा 50 हजार लोकांचा मृत्यू होईल’

0

गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे केरळमधील नद्यांंना पूर आला आहे. संपूर्ण केरळ राज्यच पाणी खाली गेले आहे. यामूळे केरळमध्ये सध्या भीषण परिस्थती निर्माण झाली आहे. या पुरात आतापर्यंत 324 लोकांचा मृत्यू झाला असून, लाखो लोकं बेघर झाले आहेत.

या पूरामुळे तब्बस 19 हजार कोटींचे नुकसान झाले अाहे. केरळच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे 2000 कोटींच्या मदतीची मागणी केली होती. मात्र केंद्रातील मोदी सरकारने 500 कोटींची मदत आतापर्यंत जाहीर केली आहे.

Loading...

देशातील विविध ठिकाणीवरून केरळमधील लोकांना मदत केली जात आहे. अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी मदत दिली आहे.

तुम्ही देखील केरळमधील लोकांना मदत करू शकता. खालील ट्विटमध्ये लिंक देण्यात आलेली आहे. तसेच फोटोमध्ये देण्यात आलेल्या अकाउंट नंबरवर देखील तुम्ही मदत पाठवू शकता. 

तसेच तुम्ही गुगलवर जाऊन देखील कशाप्रकारे मदत करता येते हे पाहू शकता, व त्यांना मदत करू शकता.

100 वर्षातील सर्वात मोठा पूर –

केरळ सध्या मोठ्या भीषण परिस्थितीला तोंड देत आहे. हा केरळमध्ये आलेला 100 वर्षातील सर्वात मोठा पूर आहे. संततधार पावसाने धरणे भरून गेल्याने 80 धरणांची दारे उघडण्यात आली असून, यामुळे अनेक नंद्यांना पूर आला असून, संपूर्ण राज्यच पाण्याखाली गेले आहे.

आतापर्यंत या पूरात तब्बल 324 जणांचा मृत्यू झाला असून, 3 लाखापेक्षा अधिक लोकं बेघर झाली आहेत. 1500 पेक्षा अधिक मदत केंद्र लोकाच्या मदतीसाठी उभारण्यात आली आहेत.

तर 50 हजार पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू होईल 

“आमच्यासाठी हेलिकाॅप्टर पाठवा. मी तुमच्याकडे भीक मागतो. आम्हाला मदत करा. माझ्या येथील लोकं मरतील. कृपा करून आम्हाला मदत करा. एअर लिफ्टिंग केल्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय नाही. आम्ही आमच्या परीने सर्व केलं. राजकीय वजन वापरून मच्छिमारांच्या बोटी देखील घेतल्या. पण आम्ही अजून करू शकत नाही. लष्कराने लवकरात लवकर येथे येण्याची गरज आहे. प्लीज आम्हाला मदत करा.”

चेन्नई येथील चेंगन्नूर येथील आमदार साजी चेरियन यांना मल्याळम चॅनेल एशियानेट यांनी पूराविषयी प्रश्न विचारल्यावर त्यांनी ही  भावनिक विनंती केली.

“प्लीज लवकरात लवकर हेलिकाॅप्टर येथे पाठवा, कोणाला तरी सांगा, तुम्ही मोदींना सांगा. जर हेलिकाॅप्टरची मदत मिळाली नाही तर आम्ही मरू. 50 हजार लोकांचा मृत्यू होईल. मी तुमच्याकडे भीक मागतो. आम्हाला मदत करा.” असे ते टिव्हीवर म्हणाले.

तसेच त्यांनी सरकारला विनंती करणारी पोस्ट देखील फेसबूकवर टाकली.

 

पोलिस आणि एनडीआरएफचे जवान लोकांना बाहेर काढत आहे –

नेव्हीकडून मदतीच्या वस्तू पाठवल्या जात आहेत –

 

Loading...

‘देसीगर्ल’ आणि निक जोन्सचा थाटामाटात साखरपुडा; सोशल मीडियावर केले फोटो शेअर

Previous article

kerala Flood : केरळला आपल्या मदतीची गरज आहे, त्यांना मदत करा; येथे पाठवू शकतात मदत

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *