टॉप पोस्टराजकारण

सावधान! प्लॅस्टिक वापरालं तर होईल 5 हजार रुपये दंड, उद्यापासून अंमलबजावणी

0

रोज सकाळी दूध आणायला, घरच समान आणायला जाणार्‍यांनी आता प्लॅस्टिक ची पिशवी घेऊन जाण टाळाच, कारण महाराष्ट्रात आता प्लॅस्टिकची पिशवी वापरताना कोणी दिसला तर त्याला तब्बल 5 हजार रूपयांचा दंड होऊ शकतो.

मार्च महिन्यात महाराष्ट्र सरकारकडून प्लॅस्टिकच्या पिशव्या, वस्तू यांच्या उत्पादनावर, विक्रीवर आणि साठवणुकीवर बंदी आणण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याची अंमलबजावणी गुडीपाडव्या पासून करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यासाठी अंमलबाजवणी समिती देखील स्थापन करण्यात आली होती.

Loading...

बंदी घालण्यात आलेल्या प्लॅस्टिक च्या साठ्यांची विल्हेवाट लावण्यासाठी सरकारकडून उत्पादकांना एक महिन्याची मुदत देण्यात आली होती. याविरोधात काही  उत्पादकांनी न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयाने ही मुदत  2 महिन्यासाठी वाढवून दिली होती. उद्या 23 जूनला ती मुदतवाढ संपत आहे आणि या नंतर प्लॅस्टिक बाळगणार्‍यांकडून 5 हजारापासून 25 हजारापर्यंत दंड आकाराला जाऊ शकतो.

महाराष्ट्र सरकारकडून घेण्यात आलेला  हा निर्णय 23 जून म्हणजे उद्यापासून लागू होईल. प्लॅस्टिक चा वापर टाळण्यासाठी आणि वापरणार्‍यांवर कारवाई करण्यासाठी 250 पोलीस निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच लोकांमध्ये प्लॅस्टिकचा वापर टाळण्यासाठी जनजागृती देखील करण्यात येणार आहे.

मुंबई महानगर पालिकेने सामान्य विक्रेते आणि फेरीवाल्यांचा विचार करता दंडाच्या रक्कमेत सुधारणा करून 200 रुपये ते 2000 रुपये असा दंड आकरण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे.

प्लॅस्टिक वापराल तर भरावा लागेल दंड- 

बंदी असलेले प्लॅस्टिक वापरणार्‍यावर पहिल्यांदा 5 हजार रुपये दंड , दुसर्‍यांदा 10 हजार रुपये  तर तिसर्‍यांदा 25 हजार रुपये दंड असा दंड आकरण्यात येईल आणि त्या नंतर शिक्षा देखील होऊ शकते.

या प्रकारच्या प्लॅस्टिक वर बंदी येणार आहे- 

थर्माकोलचे ग्लास, प्लेट्स, सजावटीसाठी वापरण्यात येणारे प्लॅस्टिक, प्लॅस्टिकचे चमचे,  हॉटेल मध्ये पार्सल साठी वापरण्यात येणारे प्लॅस्टिकचे डब्बे, प्लॅस्टिकच्या पिशव्या, प्लॅस्टिकचे ग्लास यावर उद्यापासून पूर्णतः बंदी घालण्यात येणार आहे.

या प्लॅस्टिक वर नसेल बंदी-  

दुधाच्या पॅकिंग पिशव्या, कचरा गोळा करण्याच्या पिशव्या, पॅकिंग असलेले डब्बे, औषधाच्या बाटल्या अशा वस्तूंवर बंदी नसेल, 50 मायक्रॉन पेक्षा जास्त जाडीच्या प्लॅस्टिकच्या पिशव्यांवर बंदी नसेल.

याठिकाणी प्लॅस्टिक च्या पिशव्या पूर्णपणे बंद असतील-   

सार्वजनिक ठिकाण, बस स्टँड, रेल्वे स्टेशन, शासकीय-अशासकीय संस्था, शिक्षण संस्था, मॉल, चित्रपटगृह, भाजी मंडई, दुकाने या सर्व ठिकाणी प्लॅस्टिक पुर्णपणे बंद असेल.

 

Loading...

भारतातील 70 % वापरण्यायोग्य पाणी प्रदुषित, दर वर्षी 2 लाख लोकांचा मृत्यू

Previous article

न्यूज 18, फर्स्ट पोस्ट, टाइम्स नाऊ, न्यू इंडियन एक्सप्रेस यांनी अमित शाह यांच्या ‘त्या’ बातमीबाबत घेतली माघार

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *