मुख्य बातम्या

जर पेट्रोलने शंभरी पार केली तर पेट्रोल पंप होतील बंद?

0

पेट्रोल-डिझेलच्या सततच्या वाढणार्‍या किंमतींमुळे सामान्य नागरिकांचे हाल हाल होत असताना आता आणखी एक समस्या समोर येत आहे. सध्या महाराष्ट्रातील आणि देशभरातील पेट्रोल पंप काही दिवसात बंद होण्याचे चिन्ह आहे. पेट्रोलने 100 री गाठली तर पेट्रोल पंप बंद पडतील अशी परिस्थिती आता निर्माण होईल.

देशातील पेट्रोल पंप तांत्रिक दृष्ट्या अपडेट नसल्याने ही समस्या येणार असल्याचे दिसत आहे. यामुळे सामान्यांनसह पेट्रोल पंप इंडस्ट्रीला देखील धक्का बसणार आहे.  पेट्रोलपंप चालकांवर सध्या डिस्पेसिंग यूनिट म्हणून समस्या उभी राहिली आहे. ही तांत्रिक समस्या पेट्रोलने शंभरी गाठण्याच्या आता पेट्रोल पंप चालकांनी सोडवली नाही तर पेट्रोल पंप बंद पडतील.

काय आहे हे डिस्पेसिंग यूनिट-
Loading...

डिस्पेसिंग यूनिट (डि यू) म्हणजे पेट्रोल पंपवर मशीन्समध्ये डिस्प्लेवर पेट्रोलची किंमत आणि पेट्रोलचे एका लीटर मागील प्रमाण दाखवते ती आकडेवारी. जर इंधन एका लीटर मागे 100 रुपयांवर गेले तर ह्या मशीन्स तांत्रिकदृष्ट्या सक्षम नसल्याने 100 च्या पुढील डिस्पेसिंग यूनिट  दाखवू शकणार नाहीत.  आणि पेट्रोल पंप बंद होतील. (उदाहरण- 1 लीटर- 100 रुपये)

‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, आता पेट्रोल पंप मशीनवर जे डिस्पेसिंग यूनिट आहेत ते रुपयात 2 अंक आणि पैशात 2 अंक या या पद्धतीने सेट करण्यात आले आहेत. आताचे डिस्पेसिंग यूनिट जी जास्तीत जास्त किंमत दाखवू शकतात ती 99.99 रुपये आहे.  इंधनाचा भडका असाच वाढत राहिला आणि 100 रुपये पार केले तर डिस्पेसिंग यूनिट 0.00 रुपये दाखवेल.

ऑल इंडिया पेट्रोलियम डीलर असोसिएशनचे चेअरमन एम. प्रभाकरन रेड्डी यांच्या म्हणण्यानुसार डिस्पेसिंग यूनिट ला जेव्हा डिजिटल बनवण्यात आले तेव्हा कोणाला अंदाज देखील नव्हता की एक दिवस पेट्रोलचे भाव 100 रुपये लीटरपर्यंत जातील.  याचे नुकसान पेट्रोल डीलरला आणि ग्राहकांना सोसावे लागणार आहे, कारण सिस्टमला अपग्रेड करण्यासाठी वेळ लागणार आहे.

सध्या महाराष्ट्रातील नांदेड, परभणी या शहरात पेट्रोलचे भाव 92 रुपये प्रतिलीटर पलीकडे गेले आहे. पेट्रोलचे भाव सरकारच्या नियंत्रणात नाहीत आहे सरकारने आधीच सांगून टाकले आहे. रोज पेट्रोलच्या भावात काही पैशाने वाढ होताच आहे. लवकरच पेट्रोलने शतक मारले तर सामान्यांना पेट्रोल खरेदी करणे नाकेनऊ येणार आहे. सध्या पुणे, मुंबई, नाशिक सारख्या शहरात पेट्रोल 91 रुपये लीटर आहे.


फेसबूक, ट्विटर आणि इंस्टाग्रामवर आम्हाला नक्की फाॅलो करा. तसेच व्हाॅट्सअॅपवर बातम्या मिळवण्यासाठी +91 9146424919 या नंबरवर ‘Join’ आणि ‘तुमचे नाव’ असा मेसेज नक्की करा.

 

Loading...

इंधन भाववाढ :- कॉंग्रेसकडून व्यंगचित्राच्या माध्यमातून मोदींची थट्टा, महागाई नियंत्रणात असल्याचा पंतप्रधानांचा दावा

Previous article

‘…तर जनताच बंड करील’

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *