खेळटॉप पोस्ट

FIFA WC 2018 : 36 वर्षांनी वर्ल्ड कप खेळणाऱ्या पेरूचा पराभव, पाॅलसनच्या गोलच्या मदतीने डेनमार्कचा विजय

0

21 व्या फिफा वर्ल्ड कपमधील सी ग्रुपमधील कालच्या मॅचमध्ये डेनमार्कने पेरूचा 1-0 असा पराभव केला.  दोन्ही संघ पहिल्यादांच एकमेकांविरूध्द खेळत होते. 36 वर्षांनी वर्ल्ड कप खेळणाऱ्या पेरू आपल्या पहिल्याच मॅचमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले. डेनमार्कचा हा पाचवा वर्ल्ड कप आहे. त्यांना 2014 च्या वर्ल्ड कपमध्ये क्वाॅलिफाय करता नव्हते आले.

मॅचमध्ये एकमात्र गोल डेनमार्कच्या युसुफ पाॅलसनने केला. त्याने  59 व्या मिनिटाला गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली व ती आघाडी डेनमार्कने शेवटपर्यंत कायम ठेवली.

Loading...

मध्यंतरापर्यंत पेरूचा संघ आक्रमक खेळ करत होता. दोन्ही संघ वरचढ ठरत होते. मध्यंतरापुर्वी 45 व्या मिनिटाला पेरूला पेनल्टीची संधी मिळाली होती; पण त्यांचा खेळाडू कुएवाला त्याचे रुपांतर गोलमध्ये करता आले नाही.

संपुर्ण सामन्यात डेनमार्कला 2 तर पेरूला 1 येलो कार्ड मिळाले. मॅचमध्ये पेरूचे 54 % बाॅलवर वर्चस्व होते तर 46 % डेनमार्कचे वर्चस्व होते.

डेनमार्कची पुढचा मॅच 21 जूनला ऑस्ट्रेलिया विरूद्ध असून त्याच दिवशी पेरूचा सामना फ्रांसशी होणार आहे.

(PHOTO INPUT :- FACEBOOK/FIFAWORLDCUP)

Loading...

FIFA WC 2018 : अर्जेंटिनाला अतिआत्मविश्वास नडला, आईसलॅंडने बरोबरीत रोखले

Previous article

FIFA WC 2018 : सर्बियाने कोस्टा रिकावर केली 1-0 ने मात

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More in खेळ