खेळटॉप पोस्ट

FIFA WC 2018 : पाॅल पोगबाच्या गोलच्या मदतीने फ्रांसने केली आॅस्ट्रोलियावर मात

0

21 व्या फिफा वर्ल्ड कपमधील सी ग्रुपमधील फ्रांस विरूध्द आॅस्ट्रोलिया ही लढत चांगलीच रंगली. संपुर्ण सामन्यात फ्रांसचा खेळ वरचढ ठरला व त्यांनी आॅस्ट्रोलियाचा 2-1 असा पराभव केला.

मध्यंतरापर्यंत एकाही टीमला गोल करता आला नाही. दोन्ही टीम आक्रमक खेळ करत होते तरीही सामन्यातील फ्रांसचे वर्चस्व स्पष्ट दिसत होते. मध्यंतरानंतर लगेच फ्रांसच्या अॅन्टायनी ग्रेजमैन 58 व्या मिनिटाला गोल करत टीमला 1-0 अशी बढत मिळवून दिली. पण फ्रांसला ही आघाडी जास्त वेळ टिकवता आली नाही. चारच मिनिटांनी पेनल्टी किकवर  आॅस्ट्रलियाच्या माईल जेडिनेकने 62 व्या मिनिटाला गोल करत संघाला 1-1 अशी बरोबरी मिळवून दिली.

Loading...

त्यानंतर फ्रांसच्या पोल पोगबाने 80 व्या मिनिटाला गोल करत टीमला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर फ्रांसने आॅस्ट्रोलियाला परतण्याची संधीच दिली नाही.

संपुर्ण सामन्यात 52 % फ्रांसचे वर्चस्व होते तर 48% आॅस्ट्रेलियाचे वर्चस्व होते.  या संपुर्ण सामन्यात आॅस्ट्रोलियाच्या तीन, तर फ्रांसाच्या एका खेळाडूला येलो कार्ड मिळाले.

 

Loading...

अरविंद केजरीवाल यांना प्रादेशिक पक्षांचे देखील समर्थन, लगातार सहाव्या दिवशी आंदोलन सुरूच

Previous article

FIFA WC 2018 : अर्जेंटिनाला अतिआत्मविश्वास नडला, आईसलॅंडने बरोबरीत रोखले

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More in खेळ