Royal Entertainmentटॉप पोस्ट

Pataakha Trailer – दोन बहिणींची कहानी ज्या एकमेकींचा जीव घ्यायला देखील मागे पुढे पाहत नाहीत

0

दंगल फेम सान्या मल्होत्राचा बहुचर्चित ‘पटाखा’चा ट्रेलर आला आहे. यामध्ये फेमस काॅमेडियन सुनील ग्रोवर देखील मजेशीर भुमिकेत आहे. 3.30 सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये चित्रपटाची बरीचशी कहानी स्पष्ट होते.

ट्रेलरविषयी सांगायचे तर, ही राजस्थानमध्ये राहणाऱ्या दोन बहिणींची गोष्ट आहे. दोघी जणी एकमेकींचा तिरस्कार करत असतात. एकमेकींशी सतत भांडत असतात. अाणि शेवटी लग्न झाल्यावर एकमेकांपासून लांब जातील असे वाटत असते, तर काहीतरी वेगळेच घडून लग्न देखील एकाच कुटूंबातील दोन भावांशी होते. ट्रेलरच्या शेवटी सुनील ग्रोवर एक वाक्य म्हणतो, “अटल बिहारी बाजपेयी जी ने परवेज मुशरफ जी से 100 टके की बात कही थी आगरा में, हम अपने दुश्मन तो चुन सकते हैं पर पड़ोसी नहीं, रिश्ते तो चुन सकते हैं पर रिश्तेदार नहीं.”

Loading...

या डायलाॅगवरूनच चित्रपटाविषयी थोडीफार माहिती मिळून जाते. 3.30 सेंकदाच्या या ट्रेलरमध्ये चित्रपटाची थोडीफार कथा कळत असली तरीही, शेवटचा सस्पेंस पाहणे मजेशीर असणार आहे.

‘पटाखा’ चरण सिंह पथिक यांची लघुकथा ‘दो बहनें’ यावर आधारित आहे.

‘पटाखा’ मध्ये सान्या मल्होत्रा बरोबरच, टीव्ही एक्‍ट्रेस राधिका मदान आणि सुनील ग्रोवर सुध्दा मुख्य भूमिकेत आहे. सर्वच कलाकारांचा अंदाज ट्रेलरमध्ये एकदम हटके दिसून येतोय. चित्रपटात विजय राज हे सान्या मल्होत्रा आणि राधिका मदानच्या वडिलांच्या भूमिकेत आहे.

विशाल भारद्वाज यांनी या चित्रपटाचे डायरेक्शन केले आहे.  सैफ अली खान, शाहिद कपूर आणि कंगना रणावत यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘रंगून’ नंतर त्यांचा हा चित्रपट येत आहे.  ‘रंगून’ बाॅक्स आॅफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नव्हता.

‘पटाखा’ 28 सप्टेंबरला सर्वत्र रिलिज होणार आहे.

 

Loading...

India’s Timeline :1947 नंतर भारतात घडलेल्या महत्त्वांच्या घटनांचा थोडक्यात आढावा

Previous article

Manto Trailer : अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी लढणारा एक असा लेखक, ज्याने स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानला निवडले

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *