Royal Entertainmentमुख्य बातम्या

बॉलिवूड मधल्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रींचे होते परदेशी लोकांशी प्रेमसंबंध, काहींनी तर डेटिंगनंतर….

0

असं म्हणतात की प्रेम कितीही लपवलं तरी लपत नाही आणि सध्या बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूचे प्रेम प्रकरण जोरात सुरू आहे. माध्यमांच्या बातमीनुसार, डेन्मार्कचा प्रसिद्ध बॅडमिंटनपटू आणि ऑलिम्पिक पदक विजेता मथियास बोई यांच्या सोबत तापसी मालदीवमध्ये आहे.
बातमीत किती सत्यता आहे हे सांगता येत नसले तरी पण बॉलिवूड अभिनेत्रीचे नाव परदेशी व्यक्तीशी जोडले जाण्याची ही पहिली वेळ नाही. याआधीही बऱ्याच अभिनेत्री परदेशी लोकांशी रिलेशनशिपमध्ये राहिल्या आहेत, तर त्यांच्यातील अनेकांनी आपल्या नात्याला सुंदर ट्विस्ट देऊन लग्न देखील केले आहे. चला त्या अभिनेत्रींच्या यादीवर एक नजर टाकूया.
1) प्रियंका चोप्रा – २०१८ मध्ये, राजस्थान, भारत येथे एक प्रसिद्ध आणि शाही लग्न झाले. हे लग्न होते प्रियंका चोप्राचे आणि निक जोनसचे. निक प्रियांकापेक्षा १० वर्षांनी लहान आहे, परंतु प्रेमात सर्व काही सगळं माफ असत. निकने प्रियांकाला प्रपोज केला आणि दोघांनीही लग्नासारखा अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला. त्यांचे लग्न होऊन २ वर्ष झाले आहेत व ते दोघेही एकमेकां खूप आनंदी आहेत.
2) सेलिना जेटली – बॉलिवूडमधील बर्‍याच चित्रपटांमध्ये काम करणारी सेलिना जेटली हिला दुबई मधील हॉटेल व्यावसायिक पीटर हॉग याच्यावर प्रेम झालं आणि दोघांनी एकमेकांना डेट करण्यास सुरवात केली. पण हे प्रकरण फक्त डेटिंगपुरते मर्यादित नव्हते तर २०११ मध्ये या दोघांनीही लग्न केले. सेलिना आज बॉलिवूडच्या चकाकीपासून दूर एक चांगले आयुष्य व्यतीत करत आहे.
3) प्रिती झिंटा – याच यादीमध्ये प्रीती झिंटा देखील आहे, जिने एका परदेशी तरुणाशी लग्न केले. सन २०१६ मध्ये हे लग्न गुपचूप झाले. तिच्या पतीचे नाव जीन गुडइनफ आहे. हा एक बिजनेसमॅन आहे. प्रीती झिंटाने जीनला लग्नाआधी बराच वेळा डेट केले होते आणि नंतर लॉस एंजेलिसमध्ये गपचूप लग्न केले होते.
4) राधिका आपटे – बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटे पॅडमॅन, बदलापूर, अंधाधुन यासारख्या चित्रपटात काम करणार्‍या राधिका आपटेनेही आपला जीवनसाथी म्हणून विदेशी तरुण निवडला होता. इंडस्ट्रीत येण्यापूर्वी राधिकाचे लग्न झाले होते हे आपणांस माहिती असेलच.२०१२ मध्ये तिने इंग्लंड च्या संगीतकार बेनेडिक्ट टेलरशी लग्न केले. २०११ मध्ये राधिका लंडनला समकालीन नृत्य शिकण्यासाठी गेली होती. त्याच वेळी, ती बेनेडिक्ट टेलरला भेटली आणि एका वर्षात तिने लग्नासारखा महत्त्वपूर्ण निर्णयही घेतला.
5) श्रिया सरण – ‘दृश्यम’ चित्रपटात अजय देवगणच्या पत्नीची भूमिका साकारणारी श्रिया सरनचे ही एका रशियन तरुणाबरोबर प्रेम झाले. त्यांचे लग्न संपूर्ण परंपरेने राजस्थानमधील एका राजवाड्यात झाले. पण तिचा नवरा विदेशी होता.
मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
The post बॉलिवूड मधल्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रींचे होते परदेशी लोकांशी प्रेमसंबंध, काहींनी तर डेटिंगनंतर…. appeared first on Marathi Entertainment.

उपवासाला खाल्लं जाणार ‘रताळ’ आहे आपल्यासाठी खूप फायदेशीर….. जाणून घ्या फायद्यांविषयी

Previous article

या हॉस्पिटलमध्ये झाला नवरात्रीचा चमत्कार, घटस्थापनेच्या दिवशी घडला हा चमत्कार, जाणून घ्या संपूर्ण बातमी…

Next article

You may also like

Comments

Comments are closed.