Royal Entertainmentमुख्य बातम्या

अनेक आजारांवर रामबाण उपाय ‘पपई रस’

0

पुणे – पपई मूळची मेक्‍सिको आणि वेस्ट इंडिजच्या प्रदेशातील. पपई हे स्वस्त आणि सहजतेने प्राप्त होणारे फळ आहे. फेब्रुवारी-मार्च तसेच मे ते ऑक्‍टोबर या दरम्यान पपईचा मोसम असतो. हे फळ कच्चे असताना हिरव्या रंगाचे असते व पिकल्यानंतर ते पिवळ्या रंगाचे होते. पिकलेल्या पपईमधून मिऱ्याच्या आकाराच्या काळ्या व कडू बिया निघतात. पपईच्या रसामध्ये असलेला “पेपेन’ नावाचा घटक अन्न पचविण्यासाठी अत्यंत उपयुक्‍त ठरतो.
गुणधर्म: यकृत आणि पाणथरीमध्ये पपई अत्यंत गुणकारी आहे. पपईच्या सेवनाने लघवी साफ होते, पोटही साफ राहते. पिकलेली पपई मधुर, जड, उष्ण, स्निग्ध, सारक, पित्तनाशक, वीर्यवर्धक, हृदय आणि उन्मादनाशक आहे.
जीवनसत्त्व “सी’ 46 ते 126 मि. ग्रॅम. पपईमध्ये असणाऱ्या शर्करेपैकी अर्धी शर्करा ग्लुकोजच्या स्वरूपात व अर्धी फलशर्करेच्या स्वरूपात असते. पपईमध्ये जास्तीत जास्त “ए’ जीवनसत्त्व असते. पपई जसजशी पिकत जाईल तसतसे त्यातील “सी’ जीवनसत्त्व वाढते. कच्च्या पपईमध्ये “सी’ जीवनसत्त्वाचे प्रमाण 32 मि. ग्रॅम, कच्च्या पपईमध्ये 40 ते 72 मि. ग्रॅम, अर्धवट कच्च्या पपईमध्ये 53 ते 95 मि. ग्रॅम आणि पिकलेल्या पपईमध्ये ते 68 ते 136 मि. ग्रॅम इतके असते.
औषधी उपयोग: कच्च्या पपईमध्ये पांढऱ्या रसात “पेपेन’ नावाचा पाचक रस भरपूर असतो. पोटातील पाचक रस पेप्सिनप्रमाणेच पेपेन हे परिणामकारक असते. पेपेन आहारातील प्रोटिन (प्रथिन) पचवण्यास मदत करते. कच्च्या पपईचा रस औषधी असतो. 
पिकलेल्या पपईचा मिल्कशेक किंवा रस हा अत्यंत तृप्तिदायी असतो. कच्च्या पपईच्या रस कृमींनाशक असतो. पपईच्या सेवनाने मासिक स्रावामध्ये नियमितपणा येतो. पोटाच्या तक्रारी दूर करण्यासाठी पेपेनला मान्यता दिली आहे.
संग्रहणी, मंदाग्नी अजीर्ण व मलावरोधावर पपई अत्यंत गुणकारी आहे. पांडुरोग तसेच पाणथरी वाढली असता पपई खूप फायदेशीर आहे. पपईमध्ये पेपेन शिवाय आर्जिनाइन जे वंध्यत्वाला अटकाव करते, कार्पेन जे हृदयाला उपयुक्‍त ठरते, तसेच फाइब्रिन असते जे रक्‍त गोठण्यासाठी जरूरी असते यात एन्झाइम्स देखील असतात.
पपई मूत्रगामी असल्याने मूत्रपिंडाच्या विकारांत ती फायदेशीर ठरते. पिकलेली पपई बद्धकोष्ठतेवर रामबाण औषध आहे; दमेकऱ्यांना पपई गुणकारी असते. कच्च्या पपईचा रस तोंडावर चोळल्यास तोंडावरील मुरमे व पुटकुळ्या नाहीशा होतात. चेहरा सतेज होतो आणि चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात.
पपई उष्ण असल्याने गर्भावस्थेत तिचा रस पिऊ नये. तसेच तापात व उष्णता वाढलेली असताना पपईरसाचे सेवन टाळावे.
पिकलेल्या पपईच्या बिया तृषाशामक व कृमीनाशक असतात. पपईच्या पानांचे पोटीस ज्ञानतंतूच्या दुखऱ्या भागावर बांधतात तसेच हत्तीरोगामध्ये देखील पपईचा रस उपयुक्‍त ठरतो. पपईच्या रससेवनाने चेहऱ्यावरची सूज कमी होते.
पपईचा रस वृद्धपणी उत्साह वाढवण्यास मदत करतो. पपईरस कायाकल्प करतो. 200 मि. लि. पपई रस रक्‍तशोधन करण्याचे काम करते. पपईचा 200 मि.लि. रस आणि काकडीचा 200 मि. लि. रस तासातासाने आलटून पालटून घेतल्यास तो आरोग्यदायी ठरतो.
पपईमध्ये असलेल्या अनेक प्रकारच्या एन्झाइम्समुळे ती कॅन्सरवर मात होते. विषबाधेमुळे आतड्यामध्ये असणारे सहजिवाणू नष्ट पावतात, अशा वेळी त्या जिवाणूंच्या पुनःवृद्धिसाठी पपईचा रस अत्यंत गुणकारी ठरतो.
The post अनेक आजारांवर रामबाण उपाय ‘पपई रस’ appeared first on Dainik Prabhat.

तुम्ही गायीचं दूध पिताय की म्हशीचं? जाणून घ्या कोणतं दूध आहे सर्वोत्तम!

Previous article

अनेक आजारांवर रामबाण उपाय ‘पपई रस’

Next article

You may also like

Comments

Comments are closed.