Royal politicsमहाराष्ट्रमुख्य बातम्या

आधी पक्षातली कुरघोडी थांबवा,मग आम्हाला टक्कर द्या;पंकजा मुंडेचा पवारांना खोचक सल्ला

0

बीड : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आधी त्यांच्या पक्षातली कुरघोडी थांबवावी. पक्ष एकजुट एकसंध कसा राहिल हे पहावे मग आम्हाला टक्कर द्यावी असं म्हणत ग्रामविकास पंकजा मुंडे यांनी शरद पवारांवर निशाणा साधला.त्या मंगळवारी धारूर येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी पंकजा मुंडेंनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर अक्षरश: आगपाखड केली. त्यांनी बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित केलेल्या संकल्प मेळाव्याची खिल्ली उडविली.

गोपीनाथ मुंडे यांच्या मुलीला शह देण्यासाठी खुद्द पवारांना इथे यावं लागलं हेच आमचं यश आहे. ज्या पक्षातील नेत्यांमध्ये एकीच नाही ते आम्हाला काय टक्कर देणार? असाही प्रश्न पंकजा मुंडे यानी उपस्थित केला.राष्ट्रवादीच्या मेळाव्याचा समाचार घेताना स्व. गोपीनाथ मुंडे यांचा पराभव करण्यासाठी एकदा तत्कालीन मंत्रिमंडळच बीडमध्ये तळ ठोकून होतं. पण झालं काय? तर मुंडेसाहेब लाखो मतांच्या मताधिक्याने निवडून आले. अशीच स्थिती याही वेळी कायम राहिल असा विश्वासही पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला.

Loading...

राष्ट्रवादीच्या एकाही नेत्याची माझ्यासमोर उभं राहायची लायकी नाही : पंकजा मुंडे

Previous article

महाराष्ट्राच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या ‘या’ प्रलंबित प्रश्नासाठी शरद पवार घेणार वकील हरिष साळवे यांची भेट

Next article

You may also like

Comments

Comments are closed.