मुख्य बातम्या

देवा.. पांडुरंगा.. तूच सद्बुद्धी दे महाराष्ट्राला..; सरकार व विरोधक आत्ममग्न, तर व्यवस्था लाचार..!

0

पत्रकार पांडुरंग रायकर यांचे करोनामुळे निधन.. वेळेवर बेड न मिळाल्याने झाले निधन.. दोन दिवस योग्य उपचार न मिळाल्याने मी माझा भाऊ गमावलाय.. ऑक्सिजनयुक्त बेड किंवा रुग्णवाहिका न मिळाल्याने रायाकारांचे निधन.. विभागीय चौकशीचे आदेश.. या आणि अशाच बातम्या सध्या सगळीकडे फेसबुकवर दिसतायेय. त्याने पोटात भीतीचा गोळा आलाय.. होय, कारण, एका ओळख असलेल्या व्यक्तीला अशा वाईट अवस्थेत मृत्यूला कवटाळावे लागत असेल तर सामान्य जनतेची काय स्थिती असेल..वाचक मित्र-मैत्रिणींनो, याला आपणच जबाबदार आहोत. करोना आला, त्याने हजारो जणांना आपल्यातून उठवले. तरीही आपण सगळेजण यातून काय शिकलो आहोत.. काहीच काही ना.. कुठे आलेय आपल्याला जबाबदारीचे भान.. आपण बेजबाबदार होतो आणि यापुढेही राहू.. कारण, हा अवगुण आपल्या रक्तात भिनलाय.. आज रायकर गेलेत.. उद्या असाच इतरही कोणी किंवा मीही जाईल.. पण या कोडग्या व्यवस्थेला आपण यासाठी कधीतरी जा विचारणार आहोत की नाही.. नाहीच ना.. आपण दाखवलेल्या बातम्या पाहणार.. राजकीय नेते, पत्रकार आणि समाज यांच्या नावाने बोटे मोडणार आणि एखाद्या कोणत्याही राजकीय पक्ष, संघटना किंवा नेत्यांची भाटगिरी करणार.. होय, हेच आपल्या सर्वांच्या रक्तात आहे..करोना आल्यावर जग बदलेल.. काहीतरी सामाजिक भान असलेला समाज, सरकार, प्रशासकीय यंत्रणा आणि मुख्य म्हणजे आरोग्य यंत्रणा तयार होईल.. त्यात सुधारणा होईल.. असेच आपल्या सर्वांना वाटले होते की.. पण लॉकडाऊनचे नव्याचे नऊदिवस संपले.. नवलाई संपली आणि आपण आपल्याच स्टाईलवर आलोय की पुन्हा.. आरोग्य व्यवस्थेचे तीनतेरा वाजलेले कायम आहेत. खासगी रुग्णालयात ४००० हजारांचे इंग्जेश्कन ५० हजारांना मिळतेय.. राज्य सरकार आपल्याच पाठीवर शाबासकीची थाप मारून घेतेय.. पंतप्रधान मोरांना खायला घालताना सामान्य जनतेला साधी आरोग्याची सुविधा द्यायचे आपले कर्तव्य आहे हेच विसरून जातायेत. माध्यमांमध्ये सुशांत सिंग प्रकरण पेटलेय.. आणि आपण हे सगळे उघड्या डोळ्यांनी पाहतोय..कारण, आपले हे संचिताचे भोग आहेत.. होय, आहेतच.. कोडग्या व्यवस्थेपुढे शरण गेलेले आपण सगळे स्वार्थी आणि लाचार नागरिक आहोत. नागरिक हा शब्दही आपल्याला लागू करणे म्हणजे त्या शब्दाचा अपमान आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फेसबुक लाईव करतात, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात ठोकून देतात.. त्यांच्या-त्यांच्या टीम तेच पुढे करतात.. आणि आपण त्यावर चर्वण करतोय.. कोविड योद्धा नावाचे प्रमाणपत्र वाटतोय.. लाचारांना लाज वाटत नसते.. मलाही ताशी लाज वाटत नाही.. म्हणून हे सगळे मी लिहितोय..अरे करोना आलाय.. सुधारण्याची संधी द्यायला.. यापेक्षाही कदाचित भयंकर संकट पुढे येतील.. हा देश आणि समाज आपल्याला टिकवायचा आहे.. त्यासाठी आरोग्य यंत्रणा सुधारण्यासाठी आवाज बुलंद करा.. धर्म आणि जातीच्या पल्याड समाज म्हणून एक व्हा.. देशाची अर्थव्यवस्था गर्तेत आहे.. तिला बाहेर काढण्यासाठी सहजग नागरिक बना.. नाहीतर असे कितीही पांडुरंग गेले तरीही कोडग्या व्यवस्थेला काहीच फरक पडणार नाही..पत्रकारांनो, भानावर या.. बोगस बातम्या देऊ नका.. कारण, त्यासाठी इतर माध्यमांचा वापर करण्याचे स्वातंत्र्य बोगस नागरिकांना आहे.. आपण वास्तव मांडा.. बातमीत चूक झाली तर ती काबुल करून मोठ्या मानाने आणि नव्या जोमाने खऱ्या बातम्या द्या.. जनतेला वास्तव पाहायचे आहे.. तिलाही ही कोडगी व्यवस्था सुधारायची आहे.. त्यासाठी अगोदर सुज्ञ समजल्या जाणार्यांनी सुधारण्याची तयारी दाखवावी.. शिकला आहात ना.. मग विचारी व्हा की.. हे देवा.. पांडुरंगा.. तूच सद्बुद्धी दे महाराष्ट्राला..!लेखक : सचिन मोहन चोभेलॉकडाऊनमध्ये मिळाला बुस्ट; सेवाभाव जपत ‘लोकरंग’वाल्यांनी जिंकला नगरकरांचा विश्वासAmazon वर सेल; 70 टक्क्यापर्यंत सूट, पहा फॅशनचा जलवाझालाय शेतकरी हिताचा ‘सर्वोच्च’ निर्णय; पहा SC यांनी काय दिलेत सरकारला निर्देशफ़क़्त १६ वर्षांमध्ये ‘या’ कंपनीने दिला बम्पर मनी; १० हजारांचे झाले २१ लाख रुपयेTrending : झुकेर्बर्गला घाम फोडणारी ती सिनेटर होती हॉटेलमध्ये वेट्रेस; होय, वाचा तिची प्रेरणादायी स्टोरी

एका चित्रपटासाठी ६ ते ८ कोटी रुपये एवढे मानधन घेणाऱ्या सुशांतने ‘दिल बेचारा’साठी या कारणामुळे घेतले होते फक्त एवढे मानधन !

Previous article

धक्कादायक : चीनमधून आली आणखी एक बेक्कार बातमी; पहा काय म्हटलेय पेंटागॉनने

Next article

You may also like

Comments

Comments are closed.