Royal politicsटॉप पोस्ट

पाकिस्तान : निवडणूका संपेपर्यंत नवाज शरीफ यांचे घर ‘तुरूंग’च

0

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांची मुलगी मरियम शरीफ यांची पाकिस्तानात होणाऱ्या निवडणूकीआधी जेलच्या बाहेर येण्याची आशा जवळ जवळ संपुष्टात आली आहे. आज इस्लामाबाद हाय कोर्टाने नवाज शरीफ, त्यांची मुलगी आणि जावई सफदर अवान यांची जामीन संबधी याचिकेवर स्थगिती दिली.

हाय कोर्टाच्या दोन सदस्यांच्या खंडपीठाने कार्यवाही स्थगिती देत नॅशनल अकाऊंटिब्लिटी ब्यूरोला नोटीस पाठवले. पाकिस्तानमध्ये येत्या 25 जुलैला निवडणूका आहेत. तर हाय कोर्टोत या विषयीची सुनावणी जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणार आहे.

Loading...

नवाज शरीफला लंडनमधील कथित 4 अवैध फ्लॅट प्रकरणात 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच या प्रकरणात त्यांची मुलगी मरियम शरीफला सात वर्ष आणि जावयाला एक वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

2016 मध्ये पनामा पेपर लीक प्रकरणात नाव आल्यानंतर नवाज शरिफ यांच्या अडचणीत वाढ झाली होती. त्यामुळे त्यांना 2017 मध्ये पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर मनी लाॅन्ड्रिंग प्रकरणात त्यांच्या व मुलीच्या विरोधात कारवाई सुरू झाली.

त्यानंतर पाकिस्तानच्या नॅशनल अकाऊंटिब्लिटी ब्यूरोने शरीफ आणि त्यांच्या मुलीला लंडन मधील फ्लॅट प्रकरणात दोषी आढळले आणि शिक्षा सुनावली.

मागील शुक्रवारी त्यांनी लंडनवरून लाहौरला येताच अटक करण्यात आली.

हे ही वाचा – 

पाकिस्तानात पोहचताच माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना अटक, राजकारणाला नवे वळण

 

Loading...

झारखंड:- भाजप युवा मोर्चाकडून स्वामी अग्निवेश यांना मारहाण; आता साधू ही धोक्यात?

Previous article

हरियाणातील या शाळेत शिकते फक्त एकच विद्यार्थीनी

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *