टॉप पोस्टराजकारण

पाकिस्तानकडे आहेत भारतापेक्षा अधिक अण्वस्त्रे

0

पाकिस्तानकडे भारतापेक्ष ा अधिक अण्वस्त्रे आहेत.  द टाईम्स आॅफ इंडियानुसार, स्टॉकहोम इंटरनेशनल पीस रिसर्च इंस्टिट्यूट यांच्या तर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या रिपोर्टमध्ये हे सांगण्यात आले आहे. असे असले तरीही, भारताच्या सुरक्षा विभागाचे विश्वास आहे की, भारत कोणत्याही अण्वस्त्र हल्ल्याला थांबवण्यास तसेच अशा हल्ल्यास प्रत्युत्तर देण्यास सक्षम आहे.

रिपोर्टनुसार, सद्य स्थितीत पाकिस्तानकडे 140 ते 150 अण्वस्त्रे आहेत तर भारताकडे 130 ते 140 अण्वस्त्रे आहेत. चीनकडे अशा शस्त्रांची संख्या दुप्पट आहे. त्यांच्याकडे 280 च्या जवळपास आसपास अणवस्त्रे आहेत. रिपोर्टनुसार जगातील 92 % अण्वस्त्रे ही रशिया व अमेरिकेकडे आहेत.

Loading...

जगातील अनेक देश हे अण्वस्त्रांचे आधुनिकीकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत. चीन त्यांच्या जवळ असलेल्या शस्त्रांचा आकार लहान व अधिक शक्तीशाली बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. भारत आणि पाकिस्तान सुध्दा जमीन, हवा आणि पाणी यावरून सोडण्यात येणारी अण्वस्त्रे बनवण्याचा प्रयत्न करत आहेत.

भारताने काही दिवसापुर्वीच पुर्णपणे भारतीय बनावटीची अग्नि -5 या  5000 किलोमीटर पेक्षा अधिक मारक क्षमता असलेल्या  मिसाईलचे यशस्वी  परीक्षण केले आहे.

हे ही वाचा –

न्यूक्लियर क्षमता असलेल्या अग्नि -5 चे यशस्वी परीक्षण 

(PHOTO INPUT : – TWITTER/DRDO)

Loading...

FIFA WC 2018 : 12 वर्षांनी केलेल्या गोलने स्वीडनने केली साउथ कोरियावर मात

Previous article

अखेर भाजप-पीडीपीचा काडीमोड, जम्मू काश्मीरमध्ये राज्यपाल राजवटीची शक्यता

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *