Royal politicsटॉप पोस्ट

उद्या होणाऱ्या पाकिस्तानमधील निवडणूकीविषयी जाणून घ्या सर्व माहिती

0

पाकिस्तानमध्ये उद्या (25 जुलै) निवडणूका होणार आहेत. यामुळे पाकिस्तानमध्ये सध्या गरमागरमीचे वातावरण आहे. 100 पेक्षा अधिक पक्ष 272 जागांसाठी निवडणूका लढवणार आहेत. कोणत्याही पक्षाला सरकार बनवण्यासाठी 172 जागा जिंकणे गरजेचे आहे.

काय आहे निवडणूकीचे गणित ?

Loading...

पाकिस्तानमध्ये 342 जागा आहेत. त्यापैकी 272 जागावर मदतान होणार असून 70 जागा आऱक्षित आहेत. कोणत्याही पार्टीला सरकार बनवण्यासाठी 172 जागांची गरज आहे. नॅशनल अॅसेंबलीच्या एकूण 342 जागांपैकी एकट्या पंजाब प्रांतात 147 जागा आहेत. तर सिंधमध्ये 61, खैबरमध्ये 39 आणि बलूचिस्तानमध्ये 16 जागा आहेत.

कोणते पक्ष आणि नेते आहेत चर्चेत ?

रिपोर्टनुसार, मुख्य लढत ही दोनच पक्षांमध्ये आहे. एक म्हणजे माजी पंतप्रधान नवाज शरिफ यांचा पक्ष पाकिस्तान मुस्लिम लीग – नवाज (PML-N) आणि दुसरा पक्ष क्रिकेटमधून राजकारणात वळालेल्या इम्रान खान यांचा तेहरिक-ए-इंसाफ (PTI). याशिवाय बिलाबल भुट्टो झरदारी यांचा पाकिस्तान पिपल्स पार्टी (PPP) हा सुध्दा या निवडणूकीतील महत्त्वाचा पक्ष आहे.

पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाज) – 

नवाज शरिफ यांचा पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाज) हा पक्ष सध्या अडचणीत सापडला आहे. नवाज शरिफ स्वतः जेलमध्ये आहेत. त्याच बरोबर त्यांची मुलगी मरयम ही देखील जेलमध्ये आहे. पक्षाचे नशीब हे आता नवाज शरिफ यांचे भाऊ शेहनबाज शरिफ यांच्या हातात आहे. याशिवाय सर्वाधिक 147 जागा असलेला पंजाब प्रांत देखील पक्षासाठी म्हत्वपूर्ण ठरणार आहे. शेहनबाज हे पंजाबचे माजी मुख्यमंत्री होते.

पाकिस्तान तेहरिक-ए-इंसाफ – 

या निवडणूकीत दुसरा महत्त्वाचा पक्ष आहे तो म्हणजे माजी क्रिकेटर इम्रान खान यांचा पाकिस्तान तेहरिक-ए-इंसाफ. अनेक ओपिनियन पोलनुसार इम्रान खानचा पक्ष ही निवडणूक जिंकू शकतो. 2013 च्या निवडणूकीत त्यांचा पक्ष फक्त 28 जागा जिंकला होता.

नया पाकिस्तानच्या घोषणेने इम्रान खान निवडणूक जिंकू शकतात. तसेच राजकारणात नवीन बदल आणण्याचे प्रयत्न देखील ते करत आहे. याशिवाय करप्शनला विरोध देखील ते करत असून, चांगल्या आरोग्य सेवा आणि शिक्षण देण्याचे आश्वासन देखील त्यांनी दिले आहे.

पाकिस्तान पिपल्स पार्टी – 

या निवडणूकीतील तिसरा महत्त्वाचा पक्ष म्हणजे बेनजीर भुट्टो यांचा मुलगा बिलाबल भुट्टो झरदारीचा पाकिस्तान पिपल्स पार्टी. 2013 च्या निवडणूकीत या पक्षाला विजय मिळवला होता. तसेच 31 जागांसह विरोधी पक्षाची भुमिका देखील पार पाडली होती. बिलाबल भुट्टो झरदारी यांनी काश्मिरचा विषय पुढे करत निवडणूका जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत.

याशिवाय हफिज सयद्दच्या मुस्लिम लीने अल्लाह-ओ-अकबर-तेहरिक (AAT) या पक्षाच्या नावाखाली 79 उमेदवार उभे केले आहेत.

तसेच 171 महिला उमेदवार देखील यावेळी निवडणूकीसाठी उभ्या असून यापैकी बाॅलीवूड स्टार शाहरूख खानची चूलत बहिण नूर जहान देखील निवडणूकीसाठी उभी आहे. याशिवाय 5 ट्रांसजेंडर उमेदवार देखील स्वतःचे नशीब या निवडणूकीत आजमावणार आहेत.

25 जुलैला होणाऱ्या या निवडणूकीचा निकाल 27 जुलैला लागणार आहे.

Loading...

मायावती अशा काही बोलल्या की राहुल गांधी होऊ शकतात नाराज

Previous article

लव जिहाद च्या नावाखाली लग्न करण्यासाठी गेलेल्या तरुणाला जमावाकडून बेदम मारहाण

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *