Royal politicsटॉप पोस्ट

उद्या होणाऱ्या पाकिस्तानमधील निवडणूकीविषयी जाणून घ्या 10 खास गोष्टी

0

पाकिस्तानमध्ये उद्या (25 जुलै) निवडणूका होणार आहेत. यामुळे पाकिस्तानमध्ये सध्या गरमागरमीचे वातावरण आहे. 100 पेक्षा अधिक पक्ष 272 जागांसाठी निवडणूका लढवणार आहेत. कोणत्याही पक्षाला सरकार बनवण्यासाठी 172 जागा जिंकणे गरजेचे आहे.

पाकिस्तान बरोबरच भारतातील लोकांना देखील पाकिस्तानमध्ये कोणाचे सरकार बनणार या विषयी उत्सकूता आहे.

Loading...

त्यामुळे आम्ही पाकिस्तान निवडणूका विषयीचे 10 खास गोष्टी घेऊन आलो आहोत.

1) जुलैला पाकिस्तानमध्ये 272 जांगेसाठी जनरल इलेक्शन होणार आहेत. आणि त्याचा निकाल 27 जुलैला घोषित करण्यात येणार आहे.


2) 272 जागांवर 171 महिला उमेदवार उभ्या आहेत. पाकिस्तानच्या निवडणूकीच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर महिलांना उमेदवारी देण्यात आली आहे.


3) या निवडणूकीत 100 पैक्षा अधिक अधिक पक्षांचे उमेदवार उभे राहणार आहेत. त्यापैकी नवाज शरिफ यांचा पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाज), माजी क्रिकेटर इम्रान खान यांचा पाकिस्तान तेहरिक-ए-इंसाफ आणि  बिलाबल भुट्टो झरदारी यांचा पाकिस्तान पिपल्स पार्टी या पक्षांमध्ये मुख्य लढत आहे.


4) या निवडणूकीत बाॅलिवूड अॅक्टर शाहरूख खानची चूलत बहिण नूर जहाॅं सुध्दा उमेदवार म्हणून उभी आहे.


5) फेसबुकने पाकिस्तानमध्ये होणाऱ्या या निवडणूकीसाठी सोशल मिडियाचा चूकीचा वापर रोखण्यासाठी एका टीमची देखील नेमणूक केली आहे.


6) 1947 पासून आतापर्यंत पाकिस्ताच्या इतिहासात 18 पंतप्रधान झाले आहेत परंतू एकही पंतप्रधान त्याचा 5 वर्षांचा संपूर्ण कालावधी पूर्ण करू शकलेला नाही.


7) या निवडणूकीत 5 ट्रांसजेडर्स उमेदवारांना निवडणूकीसाठी उभे राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.


8) निवडणूकीत निष्पक्षता आणि स्पष्टता राहण्यासाठी मतदान केंद्रांवर ट्रांसजेंडर समुदायाचे 125 सदस्यांची आॅब्जर्वर म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.


9) पाकिस्तान निर्वाचन आयोगानुसार, पाकिस्तानमध्ये एकूण 10,59,55,407 रजिस्टर्ड मतदार आहे.यामध्ये 4,67,31,145 महिला आहे तर 5,92,24,262 पुरूषांची संख्या आहे. पाकिस्तानची लोकसंख्या ही जवळपास 20 कोटी एेवढी आहे.


10) पाकिस्तामध्ये 96.28 %  इस्लाम, 1.6 % हिंदू आणि 1.59 % लोग ईसाई धर्म मानणारे लोकं आहेत.


उद्या (25 जुलै) ला होणाऱ्या या निवडणूकीचा निकाल 27 जुलैला घोषित होणार आहे.

हे ही वाचा – 

उद्या होणाऱ्या पाकिस्तानमधील निवडणूकीविषयी जाणून घ्या सर्व माहिती

 

Loading...

लव जिहाद च्या नावाखाली लग्न करण्यासाठी गेलेल्या तरुणाला जमावाकडून बेदम मारहाण

Previous article

मराठा आरक्षण : मराठा क्रांती मोर्चाकडून बंद मागे, शांतता राखण्याचे आवाहन

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *