Royal politicsटॉप पोस्ट

पाकिस्तानात निवडणूकीदरम्यान बॉम्बस्फोट; मतदान करण्यासाठी गेलेल्या 31 लोकांचा मृत्यू

0

पाकिस्तानातील सार्वत्रिक निवडणुकीत मतदान प्रक्रिया सुरू असतानाच क्वेटा शहरातील एक मतदान केंद्र नजीक भीषण बॉम्बस्फोट झाला आणि त्यात जवळपास 31 लोक मृत्यूमुखी पडले. या हल्ल्याची जबाबदारी दौलत – ए – इस्लामिया या संघटनेने घेतली आहे.

पाकिस्तान मध्ये आज लोकसभा आणि प्रांतीय विधान सभेच्या निवडणुकासाठी मतदान सुरू आहे. याच मतदान प्रक्रियेवेळी ही भयानक घटना घडली. याची जबाबदारी घेतलेल्या संघटनेनेच त्याच्या न्यूज एजन्सी एमाक वरून घटनेसंबंधित माहिती दिली.

Loading...

या घटनेत आतापर्यंत 31 लोक मृत्यू पावले असल्याची बातमी असली तरीही हे प्रमाण अजून वाढेल अशी शक्यता आहे. यात मोठ्या प्रमाणात लोक गंभीर जखमी देखील झाले आहेत. तर मृतांमध्ये पोलिस कर्मचार्‍यांचा देखील समावेश आहे. जखमींवर जवळच्या हॉस्पिटलमध्ये इलाज सुरू आहेत, आणि ज्या स्फोट झालेल्या स्थळापासून जे मतदान केंद्र जवळ आहेत त्या केंद्रावर मतदान काही काळासाठी रोखण्यात आले होते.

या घटनेच्या पाकिस्तानातील पक्षांनी निषेध केला आहे. या भयानक दहशतवादी हल्ल्यावर पीटीआय पक्षाचे इमरान खान यांनी ट्विट केले आहे. यात ते असे म्हणतात की, ‘क्वेटा मध्ये झालेला दहशतवादी हल्ला पाकिस्तानच्या शत्रूंकडून करण्यात आला आहे. हा हल्ला आमच्या लोकशाही प्रक्रियेला बाधा निर्माण करण्यासाठी करण्यात आला आहे. या हल्ल्याने मला दुख झाले आहे. पाकिस्तानी लोकांनी भरपूर मतदान करून दहशतवादी मान्सूभ्यांना हारवलं पाहिजे. ‘ 

ही काही एक घटना नसून अशाच एक मतदान केंद्रावर अशी बॉम्ब स्फोटाची घटना घडली. त्यात पीपल्स पार्टी चे 3 कार्यकर्ते मारल्या गेले. हा दहशतवादी हल्ला सिंध प्रांतातील लरकाना येथे झाला.

मागील आठवड्यात देखील पाकिस्तानात प्रचार रॅली मध्ये दहशतवाद्यांकडून बॉम्बस्फोट घडवण्यात आला होता, त्यात देखील अनेक लोकांचा मृत्यू झाला होता. याच कारणाने पाकिस्तानात 3 लाख 50 हजार पेक्षा जास्त सैनिकांना तैनात करण्यात आले आहे.

पाकिस्तानात सुरू असलेल्या निवडणुकीत 100 पेक्षा अधिक पक्ष 272 जागांसाठी लढणार आहेत. कोणत्याही पक्षाला सरकार बनवण्यासाठी 172 जागा जिंकणे गरजेचे आहे. नॅशनल अॅसेंबलीच्या एकूण 342 जागांपैकी एकट्या पंजाब प्रांतात 147 जागा आहेत. तर सिंधमध्ये 61, खैबरमध्ये 39 आणि बलूचिस्तानमध्ये 16 जागा आहेत.

Loading...

OPINION | होय, मी मराठा आहे आणि मी हिंसेच्या विरोधात आहे

Previous article

‘फॉर्च्यून अंडर 40’ च्या यादीत 3 भारतीय महिलांचा समावेश

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *