Royal politicsटॉप पोस्ट

पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना ठोठावली 10 वर्षाची तुरुंगवारी

0

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना पंतप्रधानपदावर असताना लंडनमधील आलिशान प्रॉपर्टी बनवल्या प्रकरणी 10 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.  त्यांच्याशी भ्रष्टाचारासंबंधीतील काही घोटाळे देखील चर्चेत आहेत. याच कारणाने पाकिस्तानमधील  न्यायलयाने  त्यांना ही शिक्षा सुनावली आहे.

लंडनमधील बेनामी संपत्ती प्रकरणी सुनावली शिक्षा- 

Loading...

ही शिक्षा लंडनमधील आलिशान प्रॉपर्टी आणि बेनामी संपत्तीशी जोडले गेले आहेत. 1993  पासून नवाज शरीफ एवेनफील्ड या  प्रॉपर्टीचे मालक होते. त्यांनी ही संपत्ती परदेशी कंपनी ‘निल्सन अँड नेस्कोल लिमिटेड’ कडून खरेदी केली होती. तपासणीच्या वेळी नवाज शरीफ आणि त्यांचे कुटुंब या प्रॉपर्टी च्या आय स्त्रोतबाबत सांगण्यास असमर्थ ठरले होते. तर या प्रॉपर्टीमध्ये कोणा दुसर्‍यालाच मालक दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

याच संबंधित पाकिस्तान न्यायालयाने भ्रष्टाचारासंबंधित प्रकरणाशी निर्णय देत नवाज शरीफ यांना 7 वर्षाची शिक्षा सुनावली आहे. तसेच या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात त्यांची मुलगी  मरियम सहभागी असल्याकारणाने 7 वर्षाची शिक्षा सुनावली आहे. याचा परिणाम पाकिस्तान मध्ये येणार्‍या निवडणुकीत नक्कीच होईल.  या शिक्षेत नवाज शरीफ यांच्यावर  80 लाखाचा दंड ठोठावण्यात आला आहे तर मुलगी मरियम हिला  20 लाखाचा दंड ठोठावला आहे.

याचा परिणाम पाकिस्तान मधील 25 जुलै ला असणार्‍या लोकसभा निवडणुकीत नक्की दिसून येईल. लाहोर येथून मरियम ह्या निवडणूक लढवणार होत्या. परंतू न्यायालयाने निर्देश दिला आहे की, या प्रकरणी दोषी ठरल्यामुळे त्यांना ही निवडणूक लढता येणार नाही.

नवाज शरीफ यांच्या या बेनामी संपत्ती प्रकरणात त्याची मुले मरियम, हूसैन आणि हसन यांचा देखील सहभाग होता.

Loading...

पुण्यात तुरुंगाच्या जेलरवरच तुरुंगाबाहेर गोळीबार

Previous article

एका ट्विटमुळे रोखली गेली 26 मुलींची तस्करी, ‘सोशल मीडिया’चा सजग वापर

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *