Royal Entertainmentमुख्य बातम्या

पचनक्रिया वाढवून लिव्हरची कार्यक्षमता वाढू शकतात हे पदार्थ…हे आहेत घरगुती उपाय..

0

जर माणसाची पचनक्रिया चांगली नसेल तर त्याला आरोग्याच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. ज्या व्यक्तीची पचनक्रिया ही उत्तम असते त्याचे आरोग्य हे अतिशय उत्तम रित्या कार्यरत राहते, असे आयुर्वेद सांगते. त्यामुळे पचनक्रिया ही उत्तम ठेवणे कधीही चांगले. पचन क्रिया जर आपली चांगली राहिली नाही तर आपल्याला इतर आजारांचा सामना देखील मोठ्या प्रमाणात करावा लागू शकतो.
त्यामुळे योग्य आहार विहार करून आपण आपली तब्येत सांभाळणे हे कधीही चांगले. पचनक्रियेवर आपल्या इतर अवयवांचे कार्य देखील अवलंबून असते. त्यामुळे हे कार्य सुरळीतपणे पार पाडावे लागते. पचन क्रिया बिघडली तर आपल्याला लिव्हर सह अनेक समस्याचा सामना करावा लागू शकतो. आम्ही आपल्याला या लेखामध्ये पचनक्रिया वाढवून लिव्हरची कार्यक्षमता वाढवण्याचे उपाय सांगणार आहोत.
1) लिंबू : आपण आपल्या आहारामध्ये लिंबाचा समावेश नियमितपणे करावा. जेवताना लिंबाची एक फोड खावी लिंबामध्ये विटामिन सी मोठ्या प्रमाणात असतात. तसेच लिंबामध्ये ऑंटीएक्सीडेंट देखील खूप मोठ्या प्रमाणात असतात. लिंबामुळे आपले शरीर ताजेतवाने राहते. तसेच लिंबाचे सेवन केल्यामुळे लिव्हर मध्ये असलेली इतर घाण देखील साफ होते. त्यामुळे लिव्हर चांगल्या प्रकारे कार्यरत राहते.
2) हळद : हा एक असा पदार्थ आहे की तो प्रत्येकाच्या घरांमध्ये आढळतोच. हळदीचा उपयोग खूप मोठ्या प्रमाणात होतो. हळदीमध्ये औषधी गुणधर्म असतात. जखम झाली तरी हळदीचा आपण उपयोग करू शकतो. हळदीच्या पाण्याचे सेवन करून आपण आपल्या लिव्हरची कार्यक्षमता वाढू शकतात. हळदीमध्ये कर्क्युमिन हा पदार्थ असतो. त्यामुळे आपल लिव्हर साफ होण्यास मदत होते. तसेच त्यामध्ये एंटीऑक्सीडेंट तत्वे देखील असतात. त्यामुळे आपले लिव्हर चांगल्या प्रकारे कार्य करते.
3) अद्रक : अद्रक यामध्ये मोठ्या प्रमाणावर ऑंटी एक्सीडेंट तत्व असतात. याचे सेवन केल्याने आपल्या अनेक समस्या दूर राहतात. लिव्हर निरोगी राखण्यास देखील यामुळे मदत होते. त्यामुळे रोजच्या जेवणात आद्रकाचे सेवन आपण नियमितपणे करावे. याचा आपल्याला चांगला फायदा होतो.
4) गाजर : गाजरामध्ये व्हिटॅमिन a याचे प्रमाण भरपूर असते. त्यामुळे गाजराचे. सेवन करून आपण निरोगी राहू शकता. तसेच गाजरामध्ये बीटा तत्व देखील असतात. आपण गाजराचा हलवा खाऊन लिव्हर निरोगी ठेवू शकतात. तसेच गाजरामध्ये इतर पोषक तत्वे देखील मिळतात.
5) हिरव्या पालेभाज्या : हिरव्या पालेभाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अँटिऑक्सिडंट असतात. त्यामुळे हिरव्या पालेभाज्या चे सेवन करून आपण लिव्हर निरोगी ठेवण्यास मदत करू शकतात. त्यामुळे पालेभाज्यांची सेवन करून आपले शरीर सुदृढ ठेवावे.
6) बीट : जे लोक अशक्त आहे तसेच ज्यांच्या शरीरात रक्ताची कमी आहे त्यांच्यासाठी बीट खाणे हे जणू मोठ्या गुणांचा खजिना आहे. बीट अनेक रोगांपासून संरक्षण करते. बीट यकृतसाठी फायदेशीर आहे कारण त्यात बिटालाईन्स असते. बीट खाल्ल्यानंतर यकृतामध्ये डिटोक्सिफाइंग एंझाइम तयार होते. एन्झाईम्स यकृत मधून विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतात.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.
The post पचनक्रिया वाढवून लिव्हरची कार्यक्षमता वाढू शकतात हे पदार्थ…हे आहेत घरगुती उपाय.. appeared first on Marathi Entertainment.

‘तारक मेहता..’ मधल्या मिसेस सोडीने या प्रसिद्ध बॉलीवूड स्टार सोबत केलय काम, जाणून घ्या त्यांच्याबद्दल

Previous article

औषधी गुणांनी परिपूर्ण आहे कडुलिंबाचे पाणी… दररोज हे पाणी पिऊन घातक रोग होतात दूर..!

Next article

You may also like

Comments

Comments are closed.