मुख्य बातम्या

राज्यात ऑक्सिजनचं चिंता मिटली ! ठाकरे सरकारने घेतला महत्वाचा निर्णय !!

0

कोविड-१९ उपचारांत रुग्णांसाठी अत्यावश्यक अशा ऑक्सिजनची वाहतूक करणाऱ्या वाहनांना रुग्णवाहिकेचा दर्जा देण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्देश दिले होते. त्यानुसार या वाहनांना रुग्णवाहिकेसारखा दर्जा देण्याची अधिसूचना गृह विभागाने सोमवारी जारी केली आहे. त्यामुळे आता वैद्यकीय ऑक्सिजनची वाहतूक करणाऱ्या या वाहनांवर सायरन असणार तसेच या वाहनांची वाहतूक रोखता येणार नाही.
राज्यात ऑक्सिजन अभावी आतापर्यंत अनेक करोना बाधित रुग्णांना प्राणास मुकावे लागले आहे. ही बाब गांंभीर्याने घेत सरकारने ठोस पावले टाकली आहेत. त्याचाच भाग म्हणून करोना बाधित रुग्णांवर वेळेत उपचार करण्यासाठी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन वायूचा पुरवठा सहजपणे उपलब्ध व्हावा यासाठी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम आणि साथ रोग अधिनियमाच्या विविध कलमांन्वये या वाहनांना रुग्णवाहिकेचा दर्जा देण्यात आला आहे.
त्यानुसार आपत्ती काळात पुढील एक वर्षासाठी वैद्यकीय कारणास्तव वापरल्या जाणाऱ्या ऑक्सिजन वायूची वाहतूक करणाऱ्या वाहनांना रुग्णवाहिका समकक्ष वाहन तसेच आपत्ती व्यवस्थापन कर्तव्यार्थ वाहन म्हणून समजण्यात येणार आहे.
महत्वाच्या बातम्या :-

कंगना सोडून आता कोरोनाकडे लक्ष द्या ; फडणवीसांचा ठाकरे सरकारला सल्ला
फडणवीस मुख्यमंत्री असतानासुद्धा त्यांचा एकेरी उल्लेख खपवून घेतला नसता : जयंत पाटील
शिवसेना दाऊदला घाबरते ; रामदास आठवलेंचा खळबळजनक आरोप !
नाथाभाऊ तुमच्याकडचे ते व्हिडिओ व फोटो जनतेसमोर आणावेत – सचिन सावंत
रोहित पवारांना कॅलक्युलेशन जमत नाही अभ्यास करुन बोलावं ; फडणवीसांचा टोला

Loading...

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. राज्यात ऑक्सिजनचं चिंता मिटली ! ठाकरे सरकारने घेतला महत्वाचा निर्णय !! InShorts Marathi.

Loading...

मोदी सरकारचा मोठा निर्णय ; खासदारांच्या पगारात होणार ३० टक्के कपात !

Previous article

आदित्यसोबत असलेली मंडळी उघडी पडल्याने मुख्यमंत्री माझ्याविरोधात गेलेत ; कंगनाचा शिवसेनेवर निशाणा

Next article

You may also like

Comments

Comments are closed.