तंत्रज्ञानभारतमुख्य बातम्या

१० हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम काढताना ओटीपी बंधनकारक

0

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या निर्देशांनंतर आता एटीएमचे फ्रॉड थांबवण्यासाठी बँकांनी विविध पावले उचलायला सुरुवात केली आहे.कॅनरा बँकेने एटीएममधून कार्डद्वारे १० हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम काढताना ग्राहकांना ओटीपी बंधनकारक केला आहे.

यानुसार, जर तुम्ही एटीएमद्वारे 10 हजारांपेक्षा जास्त पैसे काढले, तर तुम्हाला एटीएम पिनसोबत ओटीपी टाकावा लागणार आहे. कॅनरा बँकेने पैसे काढण्यासाठी 10 हजारांची मर्यादा ठेवली आहे. यापेक्षा जास्त पैसे काढल्यास तुम्हाला ओटीपी टाकवा लागणार आहे. कॅनरा बँकेप्रमाणे इतर बँकाही ही प्रणाली लागू करण्याची शक्यता आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आरबीआयच्या निर्देशांचे सर्व बँकांना पालन करायचे आहे. आरबीआयने हे स्पष्ट सांगितले आहे की एटीएमद्वारे होणारी फसवणूक रोखायला हवी.

पाककडून 31 ऑगस्टपर्यंत हवाई मार्ग वाहतुकीसाठी बंद

Previous article

‘तीन वर्षांत किती झाडे जगली ते जगाला कळू द्या’

Next article

You may also like

Comments

Comments are closed.