मुख्य बातम्या

विरोधकांची मागणी फेटाळली ; राज्यात मंदिरे आणि इतर धार्मिक स्थळं बंदच राहणार !

0

कोविड-१९ या साथीच्या आजाराचा प्रादुर्भाव वाढतच आहे. कोरोना बाधित रुग्णांचा आकडा दिवसागणित वाढत आहे. त्यामुळे काही गोष्टींवर राज्य सरकारने निर्बंध घातले आहेत. तर अनेक गोष्टी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, विरोधकांकडून सातत्याने मंदिरे आणि इतर धार्मिक स्थळे यावरील बंदी उठविण्याची मागणी केली आहे.
मात्र, सरकार आपल्या निर्णयावर ठाम राहिले आहे. दरम्यान, उच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या निर्णयात हस्तक्षेप करणार नाही, असे स्पष्ट केल्याने राज्यात मंदिरे आणि इतर धार्मिक स्थळं बंदच राहणार आहेत.
राज्य सरकार निर्णय घेईपर्यंत राज्यातील मंदिर आणि इतर धार्मिक स्थळे बंदच राहणार आहेत. कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे राज्य सरकारच्या निर्णयात हस्तक्षेप करणार नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाने आज स्पष्ट केले आहे. त्यामुळे देशातल्या काही राज्यांत धार्मिक स्थळे खुली असली तरी महाराष्ट्रात ती बंदच राहणार आहेत. या निर्णयामुळे कोरोनाच्या काळात विरोधकांची मागणी फेटाळण्यात गेली आहे.

महत्वाच्या बातम्या :-
ठाकरे सरकारची आंधळं दळतय आणि कुत्रं पीठ खातंय अशी अवस्था ; मेटेंचा गंभीर आरोप
चिंताजनक : पुण्यात गेल्या 24 तासांत १,६२१ कोरोनाबाधितांची वाढ !
रिया तुरुंगात ! सारा, श्रद्धा, दीपिकाचं काय होणार ?
मराठा समाजाला नक्कीच आरक्षण मिळवून देणार ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आश्वासन
“बिहारमध्ये विकासाचे मुद्दे नव्हते म्हणून भाजपकडून सुशांत प्रकरणाचं राजकारण”

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. विरोधकांची मागणी फेटाळली ; राज्यात मंदिरे आणि इतर धार्मिक स्थळं बंदच राहणार ! InShorts Marathi.

ठाकरे सरकारची आंधळं दळतय आणि कुत्रं पीठ खातंय अशी अवस्था ; मेटेंचा गंभीर आरोप

Previous article

माझ्याबद्दल खोटी माहिती पसरवली तर…. ; करण जोहर संतापला

Next article

You may also like

Comments

Comments are closed.