टॉप पोस्ट

OPINION : हू किल्ड द प्रेस ?

0

एखाद्या व्यक्तीला तुम्ही धमकावू शकता, त्याला भीती दाखवून घाबरूवू शकता, त्याला गोळ्या घालून त्याची हत्याही करू शकता पण…..पण तुम्ही त्या व्यक्तीचे विचार कधीच बदलवू शकत नाहीत. विचार हे विचारांनीच बदलले जाऊ शकतात. जेवढा त्या व्यक्तीच्या विचाराणा दडपण्याचा प्रयत्न कराल तेवढा अधिक त्या विचारांचा स्फोट होत असतो.

ईदच्या दोन दिवस आधी ‘रायझिंग काश्मीर’चे संपादक शुजात बुखारी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. ती काही फक्त एका संपादकाची हत्या नव्हती. ती सत्याची सुध्दा हत्या होती. शांतता प्रस्थापित करू पाहणाऱ्यांची हत्या होती. शुजात बुखारी यांच्या हत्येनंतर पुन्हा एकदा काश्मीरमध्ये पत्रकारिता करणे किती अवघड आहे हे आधोरेखीत होते. त्याच बरोबर ही घटना काश्मीरची परिस्थिती किती हाताबाहेर गेली आहे हे सुध्दा स्पष्ट करते.

Loading...

भारतातील पत्रकारितेचा आलेख दिवसेंदिवस ढासळतच चालला आहे. काही चॅनेल तर न्यूज चॅनेल चालवत नसून मनोरंजनाचे चॅनेल चालवत आहेत व जे खरी पत्रकारिता करू पाहत आहेत त्यांना दडपण्याचा प्रयत्न केला जात आहेत. महिला पत्रकारांना बलात्काराच्या धमक्या, जीवघेण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. या धमक्यांची दखल युएनने सुध्दा घेतली आहे.

1992 ते 2018 मध्ये 47 पत्रकारांची हत्या करण्यात आली आहे तर काश्मीरमध्ये 19 पत्रकारांची हत्या झाली आहे. जागतिक वर्ल्ड प्रेस फ्रिडम इंडेक्समध्ये भारताचा क्रंमाक 138 वा आहे आणि याच यादीत पाकिस्तानचा क्रमांक 139 वा आहे. पाकिस्तानचा इथे उल्लेख करण्याचे कारण पाकिस्तान पेक्षा आपण फक्त एक क्रमांक पुढे आहोत व आपली मंडळी यातच समाधान मानणारी आहेत.

मागील वर्षी सप्टेंबरमध्ये गौरी लंकेश यांची त्यांच्या घराच्या बाहेर गोळ्या घालून हत्या करण्यात आली. नऊ महिन्यातच शुजात बुखारी यांची दुसरी हत्या. त्यामुळे पत्रकार व विचारवंताची सुरक्षा किती गांभीर्याने घेतली जात आहे ते दिसून येते. दिवसेंदिवस या धमक्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे.

भारतात मिडियावर निर्बंध आणण्याचे काम काही आजचे नाही. आणीबाणीपासून मिडियावर निर्बंध आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. सरकार कोणत्याही पक्षाचे असो, प्रत्येकाने मिडियाचा स्वताच्या फायद्यासाठी, प्रोपगंडा पसरवण्यासाठी वापर केला आहे. आणीबाणी व आताच्या मिडियामध्ये फरक फक्त एवढाच आहे की, त्यावेळचे निर्बंध हे सक्तीचे होते. घोषित होते. आताच्या मिडियाने हे निर्बंध स्वताहून लादून घेतले आहेत. एका विशिष्ट विचारांच्या बाजूला आताचा मिडिया झुकलेला दिसून येताे.

कोब्रा पोस्ट या आॅनलाईन पोर्टलने मिडियाविषयी केलेल्या इन्वेस्टिगेशनने भारताच्या सध्याच्या मिडियाची परिस्थिती स्पष्ट होते. या स्टिंगमध्ये मोठ्या मोठ्या मिडिया हाऊसेसने पैशांसाठी एका विशिष्ट विचारसरणीच्या बाजूने पत्रकारिता करण्यास होकार दिला आहे. त्यामुळे मिडियाच्या स्वताच्या विश्वासहार्यत्येवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण होतात.

त्यामुळे प्रश्न असा पडतो की, पत्रकारितेची हत्या कोणी केली? मिडियावर निर्बंध आणणाऱ्यांनी? पत्रकारांना धमकावणाऱ्यांनी? की पैशासाठी एका विशिष्ट विचारसरणीचे पाईक होणाऱ्यां स्वतः मिडियाने ?

(PHOTO INPUT : – AFP)

Loading...

अरविंद केजरीवाल यांना प्रादेशिक पक्षांचे देखील समर्थन, लगातार सहाव्या दिवशी आंदोलन सुरूच

Previous article

J&K:- दहशतवादी विरोधी कारवाया थांबवल्यानंतर देखील दहशतवादी हल्ल्याचे प्रमाण वाढले

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *