Royal politicsटॉप पोस्ट

सर्वोच्च न्यायालयाच्या 23 न्यायाधीशांपैकी केवळ 12 न्यायाधीशांची संपत्ती जाहीर

0

सर्वोच्च न्यायालयाच्या 23 न्यायाधीशांपैकी केवळ 12 जणांनी सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाइटवर आपली मालमत्ता जाहीर केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीशांच्या पदावर असलेल्या सर्वांना आपल्या मालमत्तेचे तपशील सार्वजनिक करण्यासाठी सांगण्यात आले होते. हा तपशील न्यायालयाच्या वेबसाइट वर प्रकाशित करण्यात येणार होता.

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या मालमत्तेचे तपशील सार्वजनिक करण्यासाठीचा ठराव पास करण्यात आला होता. परंतू आता पर्यंत निम्म्या न्यायाधीशांनी त्यांच्या मालमत्ता आणि गुंतवणुकीचा खुलासा उच्च न्यायालयाच्या वेबसाइटवर केला आहे. म्हणजे 23 न्यायाधीशांपैकी केवळ 12 न्यायाधीशांच्या नावांचा उल्लेख वेबसाइटवर आहे.

Loading...

मुख्य न्यायाधीश (CJI) दीपक मिश्रा, ज्येष्ठ नुसार न्यायाधीश जस्टिस रंजन गोगोई, न्या. लोकूर, न्या. कुरियन जोसेफ, न्या. सीकरी या चार न्यायाधीशांनी आपली संपत्ती जाहीर केली आहे. न्या. एन.व्ही.रामणा, अरुण मिश्रा, एस.ए.बॉब, ए.के.गोयल, आर.बनौमती, खानविलकर आणि अशोक भूषण यांची त्यांच्या कुटुंबियांसमवेत गुंतवणूक आणि संपत्ती वेबसाइट वर प्रकाशित करण्यात आली आहे.

मुख्य न्यायाधीश दीपक मिश्रा त्यांना ऑक्टोबर 2011 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून पदोन्नती मिळाल्यानंतर मे 2012 मध्ये त्यांची संपत्ती जाहीर करण्यात आली होती.त्यानुसार जाहीर करण्यात आलेल्या संपत्ती, गुंतवणुकीनुसार यांच्यावर विविध बँकांचे 33 लाखांपेक्षा जास्त कर्ज आहे. 7.4 लाख रुपयांची मुदत ठेव, एक सोन्याची साखळी, दोन सोन्याच्या अंगठ्या आहेत. तर दिल्लीतील सुप्रिम एन्क्लेव येथे एक निवासी फ्लॅट आहे. तसेच कटकमध्ये 2003 साली त्यांनी घर बांधले आहे.

न्यायाधीश गोगोई यांच्या वेबसाइट वर 6 जूनला आपली मालमत्ता, संपत्ती प्रकाशित केली होती, त्यानुसार गुवाहाटीत त्यांची जमीन 65 लाख रुपयाना विकली आहे.

न्यायाधीश लोकूर यांनी 20 जुलै 2012 रोजी आपली संपत्ती वेबसाइटवर प्रकाशित केली आहे.यानुसार नवी दिल्लीतील वसंतकुंज येथे स्वमालकीचा फ्लॅट आहे तर नोएडातील जेपी ग्रीन दुसर्‍या फ्लॅट खरेदी प्रक्रिया चालू आहे.

न्यायाधीश जोसेफ यांच्याकडे केरळमध्ये सहा तुकड्यांची विभागलेली स्वमालकी जमीन आहे. त्यातील काही त्यांच्या पत्नी आणि मुलाच्या संयुक्त मालकी नावे आहे.

न्यायाधीश सीकरी हे ग्रेटर नोएडातील एका मजली इमारतीचे मालक आहेत, तर त्यांच्या पत्नी व मुलगा दिल्लीच्या पॉश हौझ खास परिसरात संयुक्त मालकी हक्क असलेली मालमत्ता आहे.

सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईटमध्ये न्या. आरएफ नरीमन, ए.एम.सप्रे, यू.यू.ललित, नवीन सिन्हा, डी.वाय.चंद्रचुड, एल.नागेश्वर राव, संजय किशन कौल, मोहन एम शांतागुडकर, एस अब्दुल नाझीर, दीपक गुप्ता व इंदू मल्होत्रा यांची नावे मालमत्ता, दायित्वे, संपत्ती आणि गुंतवणूक या यादीत नाहीत.

Loading...

मेक्सिकोमध्ये ऐतिहासिक बदल; राष्ट्रपती निवडणुकीत पहिल्यांदाच डाव्या विचारसरणीच्या नेत्याचा विजय

Previous article

बुराडी मृत्यूकांड- 11 जणांच्या मृत्यूचे गूढ ‘डायरी’मध्ये; जाणून घ्या काय आहे हे प्रकरण

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *