Royal politicsटॉप पोस्ट

‘एक देश एक निवडणूक’ हा भाजपचा संकल्प होईल का पूर्ण? या 12 राज्यात होऊ शकतात निवडणुका

0

‘एक देश एक निवडणूक’ या संकल्पावर भाजपची चक्रे फिरण्यास सुरुवात झाली आहे. हा संकल्प सत्यात आणण्यासाठी भाजप आणि अमित शाह यांनी जोरदार तयारीला सुरुवात केल्याचे चित्र सध्या दिसत आहे. 2019 ला लोकसभेनिवडणुकीबरोबरच तब्बल 12 भाजपशासित राज्यात विधानसभा निवडणुकी घेण्याची सूत्र हालू लागली आहेत.

नोव्हेंबर – डिसेंबरमध्ये छत्तीसगड, मध्यप्रदेश, राजस्थान , मिझोरम या राज्यात विधानसभा निवडणुका येऊ घातल्या आहेत. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोदी लाटेच्या आधारे या राज्यांच्या निवडणुका उरकायच्या असा भाजपचा मानस असल्याचे दिसत आहे.

छत्तीसगड, मध्यप्रदेश, राजस्थान , मिझोरम या राज्यात विधानसभेची मुदत संपण्याआधी या राज्यातील सरकार पाडून किंवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यायला लावून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करायची असा प्रयत्न भाजपकडून होऊ शकतो, याचा फायदा असा की राज्यात सरकार पडल्या नंतर राष्ट्रपती राजवट लागू करून पुन्हा निवडणूक घेण्यासाठी 6 महिन्याचं कालावधी भाजप ला मिळू शकतो. आणि लोकसभेची मुदत संपल्यावर 2019 च्या लोकसभेच्या निवडणुकीवेळी एकाच वेळी देशात एकत्र निवडणूक घेण्याचा विचार भाजप करीत आहे.
Loading...

एक देश एक निवडणूक घेण्यात यावी यासाठी भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिल्याची बातमी आहे. यात त्यांनी म्हंटले आहे की, ‘निवडणुका एकत्र घेतल्या तर त्याचा फायदाच होईल.’ एकत्र निवडणुका घेतल्या तर देशाच्या संघराज्य पद्धतीला तडा जाईल या म्हणण्याला काही अर्थ नाही, उलट यामुळे संघराज्यात्मक रचना अधिक सुदृढ होईल, आणि मोठा खर्च वाचेल असे देखील त्यांनी या पत्रात म्हटले आहे.

लोकसभा निवडणुकांवेळीच तेलंगणा, आंध्रप्रदेश, ओडिसा या राज्यात देखील निवडणुका होणार आहे. यामुळे देशातील इतर राज्यात देखील याच वेळी निवडणुका घेण्याचा विचार भाजप करित आहे. अरुणाचल प्रदेश, हरियाणा, सिक्किम, झारखंड आणि महाराष्ट्र या राज्यात विधानसभा निवडणुकांपूर्वीच लोकसभेच्या बरोबरीने निवडणुका घेण्याचा भाजपचा प्रयत्न असेल.

म्हणजे छत्तीसगड, मध्यप्रदेश, राजस्थान, मिझोरम,  तेलंगणा, आंध्रप्रदेश, ओडिसा, अरुणाचल प्रदेश, हरियाणा, सिक्किम, झारखंड आणि महाराष्ट्र या  तब्बल 12 राज्यात निवडणुका एकत्र घेण्याचा मानस सध्या भाजपचा दिसत आहे. 

या आधी भाजपने जम्मू काश्मीर मधील पीडीपी बरोबरची युती तोडली आहे, सध्या तेथे देखील राज्यपाल राजवट लागू आहे जी 6 महिन्यांसाठी लागू राहू शकते, या 6 महिन्यात राज्यात सत्ता स्थापनेचा दावा करणारा पक्ष सत्तेत येईल. परंतु अजून याबद्दल कोणतीही स्पष्टता आली नाही.

(source :- Election Commission Of India)   

                    

Loading...

हे असे देश आहेत जिथे पैसे फेकले की मिळते नागरिकत्व, जसे मेहुल चोक्सीला मिळाले

Previous article

India’s Timeline :1947 नंतर भारतात घडलेल्या महत्त्वांच्या घटनांचा थोडक्यात आढावा

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *