Royal politicsटॉप पोस्ट

पूजा करणे हा महिलांचा संवैधानिक अधिकार आहे आणि यासाठी कोणत्याही कायद्याची गरज नाही : सुप्रीम कोर्ट

0

सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशावर बंदी संदर्भात सुनावणी करताना सुप्रीम कोर्ट म्हणाले की, पुजा करणे हा महिलांचा संवैधानिक अधिकार आहे आणि यासाठी कोणत्याही कायद्याची गरज नाही.

केरळच्या या प्रसिध्द मंदिरात 10 ते 50 वर्षांच्या महिलांना प्रवेश करण्यास बंदी आहे. 12 व्या शतकामध्ये सबरीमाला मंदिर बनवले होते. ते केरळमधील पथानामथिट्टा जिल्ह्यात असून, भगवान अयप्पा यांना समर्पित आहे. गेली 800 वर्ष ही रूढ पारंपारिक प्रथा तेथे चालू आहे.

Loading...

द इंडियन यंग लाॅयर्स असोसिएशन यांनी या विरोधात जनहित याचिका दाखल केली होती.

चीफ जस्टिस म्हणाले की, तुम्ही कोणत्या अधिकाराखाली प्रवेशास बंदी घालत आहात. हे संविधानाच्या विरोधात आहे. जर हे लोकांसाठी उपलब्ध असेल, तर तेथे कोणीही जाऊ शकते.

या प्रकरणाची सुनावणी करताना जस्टिस डी वाय चंद्रचूड म्हणाले की, प्रत्येक महिलेला देवानेच बनवले आहे आणि मंदिरामध्ये पूजेसंबधी त्यांच्याबरोबर भेदभाव होणे योग्य नाही.

सध्याचा नियम काय आहे?

सध्या या मंदिरात 10 ते 50 वर्षांपर्यंतच्या महिलेला प्रवेशास बंदी आहे. याच बंदीवर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. चीफ जस्टिस दीपक मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाकडे सुनावणी सुरू आहे. या खंडपीठात जस्टिस आर एफ नरिमन, ए एम खानविलकर, डी वाय चंद्रचूड़ और इंदू मल्होत्रा यांचाही सहभाग होता.

मागील वर्षी आॅक्टोंबरमध्ये सुप्रीम कोर्टोने या प्रकरणाला ‘महत्त्वपुर्ण’ मानत या प्रकरणाला न्यायालयातर्फे स्थापन करण्यात आलेल्या सदस्यीय घटनापीठाकडे सोपवण्यात आले आहे. सुप्रीम कोर्टातील या सुनावणी दरम्यान सरकारने अापला पक्ष ठेवत म्हटले की, महिलांना देखील मंदिरामध्ये प्रवेश दिला गेला पाहिजे.

2015 मध्ये केरळ सरकारने महिलांना प्रवेश देण्याचे समर्थन केले होते. मात्र 2017 मध्ये त्यांनी आपला निर्णय बदलला.

आर्टिकल 14 हे समानतेचा हक्क देते. आर्टिकल 15 नुसार धर्म, वंश, जात, लिंग आणि जन्माच्या जागेवरून भेदभाव करण्यास बंदी आहे.तर आर्टिकल 17 नुसार अस्पृश्यतेवर बंदी आहे. 

Loading...

मोदी सरकारविरोधात लोकसभेत विरोधकांकडून अविश्वासदर्शक ठराव; शेतकरी प्रश्न सोडवण्यात अपयशी?

Previous article

चीनच्या इतिहासातील 7 अब्ज रूपयांचा पहिलाच बिग बजेट सिनेमा बॉक्सऑफिसवर आपटला

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *