Royal politicsटॉप पोस्ट

ताजमहालाचे संरक्षण करू शकत नसाल तर तो पाडून टाका; सर्वोच्च न्यायलयाने सरकारला फटकारले

0

देशाची शान आणि जगातील आश्चर्य म्हणून जगभरात प्रसिद्ध असलेल्या ताजमहालची अवस्था बिकट होत चालली असल्याचे आपल्याला नेहमीच ऐकायला येते. पण हे मानण्यास सत्ताधारी नेते आणि मंत्री तयारच होत नाही.

बहुतेक याच मुळे जो प्रश्न प्रशासकीय पातळीवर सोडवला जाऊ शकतो त्यात न्यायालयाला आपले मत मांडावे लागले.

Loading...

मोगल कालीन या ऐतिहासिक वास्तूचे संरक्षण आणि देखभालीबाबत सरकारने कोणतीही ठोस भूमिका घेतल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे “एकतर आम्ही ताजमहाल बंद करतो किंवा तुम्ही तरी तो उद्धवस्त करून टाका,” अशा संतापजनक भाषेत सर्वोच्च न्यायालयाने काल केंद्र सरकार आणि उत्तरप्रदेश सरकारला फटकारले.

यावरून केंद्र सरकार जगात प्रसिद्ध असलेल्या ताजमहाल बद्दल सरकार उदासीन असल्याचे दिसून येत आहे. आणि यामुळे देशातील पर्यटनासाठी प्रसिद्ध वास्तू जर सुरक्षित नसतील तर पर्यटनातून येणारा महसूल सुद्धा कमी होतो.

ताजमालालाच्या देखभालीबाबत आणि डागडुजीकडे दुर्लक्ष होत आहे या कारणाने दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर न्यायालयाने आपले मत स्पष्ट केले.

आयफेल टॉवर पेक्षाही सुंदर वास्तू आपल्या देशात अस्तित्वात आहे. त्यामुळे देशात असलेली विदेशी चलनाची समस्या दूर होऊ शकते. असे देखील सर्वोच्च न्यायालयाने सरकारला स्पष्ट केले. आयफेल टॉवर पाहायला 80 मिलियन लोक येतात. आणि ताजमहाल पाहण्यासाठी 1 मिलियन लोक असे सांगत न्यायालयाने सरकारच्या प्रयत्नांबद्दल नाराजी व्यक्त केली.

ताजमहालच्या परिसरात देखील लोक उद्योग उभारण्यासाठी परवानगी मागत आहेत, आणि त्यांच्या या परवानगीवर विचार देखील केला जात आहे. हे योग्य नाही. याने ताजमहाल या वास्तूला धोका पोहचू शकतो. असे देखील म्हणत न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले.

Loading...

‘डाटा मोफत आहे, शिक्षण नाही’ – जिओ इंस्टीट्यूटच्या ट्विटर अकांऊटवरील मजेशीर ट्विट वाचून तुम्ही खळखळून हसाल

Previous article

आध्यात्मिक गुरु दादा वासवाणी यांचे निधन

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *