मुख्य बातम्या

मराठा आरक्षणावर रोहित पवार म्हणतात,”महाविकास आघाडी सरकारवर पूर्ण विश्वास”

0

सरकारी नोकऱ्या तसेच शैक्षणिक प्रवेशात मराठा आरक्षण देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 2018 साली बनविलेल्या कायद्याच्या अंमलबजावणीस सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी तात्पुरती स्थगिती दिली. ज्यांना यापूर्वी या आरक्षणाचा लाभ मिळाला आहे, त्याला धक्का लागणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
यानंतर आता मराठा आरक्षणावरून राजकारण सुरू झालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केलं आहे. रोहित यांनी शुक्रवारी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे.

सरकारही पूर्ण प्रयत्न करत असल्याचं मी पाहतोय. तसंच आरक्षण कायमस्वरूपी टिकवण्यासाठी घटना पीठाकडं पाठवण्याची मागणीही आपणच केली होती. लाखो युवांच्या भावनेचा व भविष्याचा हा प्रश्न असून अंतिम निकाल हा आरक्षणाच्याच बाजूने लागेल,असा विश्वास आहे. यात कुणीही राजकारण करु नये.#सत्यमेवजयते!
— Rohit Pawar (@RRPSpeaks) September 11, 2020

“महाविकास आघाडी सरकार व न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे. अंतिम निकाल हा आरक्षणाच्याच बाजूने लागेल असा विश्वास आहे. यात कुणीही राजकारण करु नये” असं रोहीत यांनी म्हटलं आहे. “मराठा आरक्षण व केंद्र सरकारने खुल्या वर्गातील आर्थिक दुर्बलांसाठी दिलेलं 10% आरक्षण हे दोन्ही प्रकरणं सर्वोच्च न्यायालयाने घटना पीठाकडं सोपवले. पण तसं करताना फक्त मराठा आरक्षणालाच स्थगिती दिली, हे धक्कादायक आहे. तरी #MVA सरकार व न्यायालयावर आपला पूर्ण विश्वास आहे” असं ट्विट रोहित पवार यांनी केलं आहे.
महत्वाच्या बातम्या :-

केंद्र सरकारकडून राज्याला २२,५३४ कोटी रुपये येणे बाकी – अजित पवार
हाताला काम द्या खिशाला दाम द्या ; कलाकारांच्या वतीने पुण्यात आंदोलन
24 तासांत पुण्यात सापडले कोरोनाचे रेकॉर्ड ब्रेक रुग्ण , पहा आकडेवारी
मोठी बातमी : जमावबंदीचं उल्लंघन केल्याप्रकरणी अजितदादांसह राष्ट्रवादीच्या ११ नेत्यांना नोटीस
माझी पण इच्छा आहे माझ्या नावावर अशी बिल्डिंग करावी ; शरद पवारांनी कंगनाची उडवली खिल्ली

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. मराठा आरक्षणावर रोहित पवार म्हणतात,”महाविकास आघाडी सरकारवर पूर्ण विश्वास” InShorts Marathi.

कंगनाच्या बेकायदेशीर बांधकामाला भाजप, रिपाइं आणि राज्यपालांचे समर्थन आहे?

Previous article

“उद्धव ठाकरेंनी अयोध्येला येऊ नये नाहीतर…” अयोध्येतील संतांकडून मुख्यमंत्र्यांना धमकी

Next article

You may also like

Comments

Comments are closed.